शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

बुध्दीमान लोक या पाच गोष्टी कधीही करत नाही

मित्रांनो या पाच गोष्टी चुकून पण तुमच्या आयुष्यात करू नका. आज आम्ही तुम्हाला आशा पाच गोष्टी सांगणार आहे. ज्या गोष्टी बुध्दीमान लोक आपल्या आयुष्यात कधीही करत नाही. तुम्हाला या गोष्टी लवकर समजण्यासाठी आम्ही काही उदाहरणे दिली आहे. 


१) कधीही कोणत्याही कारणाशिवाय वादविवाद करू नये. 

जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती सोबत कारण नसताना वादविवाद करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुकी करत आहे उदाहरणार्थ : पूजा एक हुशार मुलगी आहे. ती नेहमी शाळेतून पहिल्या क्रमांकावर पास होत असते. ती नेहमी तिचे ज्ञान वाढवत असते. तरी पण इतकी हुशार मुलगी असून ती कोणालाही आवडत नाही. कारण तिची खूप वाईट सवय ती कोणाशीही वादविवाद करत असते. आणि वादविवाद करून ती स्वतःला बरोबर आणि दुसऱ्याला चुकीच सिद्ध करत असते. 


जेव्हा पूजा तिच्या मैत्रिणींन किंवा परिवारा सोबत असायची आणि जर तिथे कोणत्या विषयावर चर्चा सुरू असायची तर पूजा स्वताला हुशार व ती बरोबर आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांन सोबत वादविवाद घालत असायची. प्रत्येक वेळा वादविवाद मध्ये 
जिंकायची पण तीच्या याच वादविवादा मुळे लोक तिच्या दुर राहायला लागले. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही कधीही कोणत्याही कारणाशिवाय समोरच्या व्यक्ती सोबत वादविवाद करतात. तेव्हा समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट फार घाण वाटते. म्हणून कधीही कोणत्याही कारणाशिवाय वादविवाद करू नये. 


 २) जेव्हा तुमची चूक नसताना कोणीही तुमच्या सोबत वादविवाद करायला येतो तेव्हा त्याच्या सोबत वादविवाद करू नका. 


उदाहरणार्थ : मित्रांनो एक सुमित नावाचा माणूस होता. तो एका बस मध्ये प्रवास करत होता. आणि त्या बाकी लोक 
पण त्या प्रवासाचा आनंद घेत होते. पण पुढच्या बस स्थानकापासून एक माणूस त्याच्या तीन लहान मुलांना घेऊन बस मध्ये चढला. ती लहान मुले बस मध्ये चढल्यावर खूप मस्ती करु लागले. उड्या मारू लागले पळू लागले व मोठ मोठ्याने आरोळ्या मारु लागले. त्या लहान मुलांन पासून बस मधील सगळ्या प्रवाश्यांना त्रास होऊ लागला. सुमित ला पण खूप त्रास होऊ लागला ज्यामुळे न राहता त्याने उठून त्या लहान मुलांच्या वडिलांन कडे जाऊन म्हणाला. सर तुम्ही आपल्या मस्ती खोर मुलांना शांत बसायला लावा. इथे सर्वाना फार त्रास होत आहे. नाहीतर आम्हाला न राहता पुढच्या बस स्थानकावर उतरावे लागेल. हे ऐकून त्या लहान मुलाच्या वडीलांना फार क्रोध आला. पण त्यांनी क्रोध न करता शांतपणे बुध्दीचा वापर करून म्हणाला.


माफ करा सर तुमचे म्हणणे बरोबर आहे मी यांना पहिलेच शांत करायला पाहिजे होते. पण दोनपूर्वी याच्या आईचे निधन झाले आहे. तेव्हापासून हि मुले शांत होऊन गेले होते. आणि जेव्हा मी यांना बाहेर फिरवण्यासाठी आणले तेव्हा ते आपल्या दु:ख विसरून आनंदाने खेळू लागले म्हणून मी यांना थांबवले नाही हे ऐकून त्या सर्व लोकांचा क्रोध एका मिनिटांत शांत झाला. 
आणि जो सुमित भांडण करायला आला होता तो त्या लहान मुलांन सोबत खेळू लागला आणि बाकी सगळे पण त्याच्या सोबत खेळू लागले. तर बघितले मित्रांनो आपण बुद्धमान लोक मोठ्या संकटातून पण सहज बाहेर निघतात. ते शत्रू ला पण आपला मित्र बनवतात. मित्रांनो तुम्ही पण आशा प्रकारे तुमच्या पासून वादविवादा दूर ठेवू शकतात.


३) कधी कोणालाही म्हणायचे नाही की तुम्ही चुकीचे आहे

मित्रांनो मला माहीत हे ऐकून तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल पण बुद्धीमान लोक कधीच सरळ कोणाला जाऊन म्हणत नाही कि तुम्ही चुकीचे आहेत. या गोष्टीला समजण्यासाठी पण आपण एक उदाहरण घेऊया. 


उदाहरणार्थ : निखिल भाऊचा चंदन लाकडाचा व्यवसाय होते. आणि ते आपल्या व्यवसाय मध्ये खूप मोठे होते. आणि दुसरी कडे संकेत भाऊ एक चांगले सुतारकाम करणारे होते. पण ते फक्त आपल्या कामात साध्या लाकडाचा वापर करत असे. एक वेळा त्यांच्या ग्राहकाने त्यांना चंदनाच्या लाकडाच्या वस्तूची आर्डर दिली. संकेत भाऊना कळले कि मार्केट मध्ये निखिल भाऊचा चंदनचे लाकूड चांगल्या क्वालिटी मध्ये देतात. तर संकेत भाऊंनी निखिल भाऊंना आर्डर दिली. पण संकेत भाऊंनी जेव्हा त्या लाकूडाना बघितले तेव्हा त्यांना खूप क्रोध आला. आणि निखिल भाऊंना शिवीगाळ देऊ लागले. 


हे ऐकून निखिल भाऊंना पण क्रोध आला पण त्यांनी आपल्या क्रोधावर कंट्रोल करून त्यांनी खूप शांतपणे संकेत भाऊंना म्हणाले. कि तुम्ही आधी चंदनच्या लाकडावर काम केले आहे का ? तेव्हा संकेत भाऊ म्हणाले नाही मी पहिल्यांदा हे काम करतोय. निखिल भाऊं त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. जर तुमचे काम झाल्यावर चंदन लाकडाची क्वालिटी चांगली नाही आहे. तर मी तुमचे पैसे वापस देऊन देईल. संकेत भाऊंना निखिल भाऊंची ही गोष्ट चांगली वाटली. आणि त्यांनी चंदन लाकडाचा वापर करणे चालू केले. आणि

एका हप्त्यात संकेत भाऊंचे काम पूर्ण झाले. आणि ते पण चांगल्या प्रकारे. तेव्हा संकेत भाऊंना आपली चुकी समजली व त्यांनी निखिल भाऊंना फोन करून माफी मागितली. 

आणि पुढच्या व्यवसायासाठी खुप मोठी आर्डर निखिल भाऊंना दिली. तर मित्रांनो बघितले निखिल भाऊंना माहित होते की संकेत भाऊ चूकीचे आहे. तरी पण त्यांनी सरळ संकेत भाऊंना म्हटले की नाही तुम्ही चूकीचे आहे. पाहीला गेलं तर ते वादविवाद करून स्वतःला बरोबर सिद्ध करु शकले असते. पण त्यांनी तसे नाही केले. त्यांनी संकेत भाऊंची चूक त्यांना कळवून दिली. आशा प्रकारे त्यांनी शत्रू ला पण मित्र बनवले.म्हणून कधी कोणालाही म्हणायचे नाही की तुम्ही चुकीचे आहे. 

४) कोणालाही पुन्हा पुन्हा आर्डर देऊ नका. 

जेव्हा कोणीही आपल्याला नौकर समजून आर्डर देतात तेव्हा आपल्याही क्रोध येतो.मित्रांनो पुन्हा पुन्हा आर्डर देण्याची सवय अत्यंत वाईट आहे. जर तुम्हाला ही सवय असेल तर तुम्ही न कळता तुमच्या आयुष्यात विष भरत आहेत. या गोष्टीला समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. 

एक सुदर्शन नावाचा मुलगा होता. त्याची मैत्रीण स्मिता त्याला खुप पुन्हा पुन्हा काम सांगत असे. याच गोष्टी मुळे सुदर्शनला असे वाटत असे की त्याच्या स्वतंत्र आयुष्यला कोणीही बंद केले आहे. याच गोष्टी पासून तो त्याच्या मैत्रीण पासून दूर राहू लागला. त्याच्या मैत्रीणला पण ही गोष्ट हळूहळू समजू लागली. ती वाटलं जर तीने काही नाही तर त्याची मैत्री संपूण जाईल. 

तिने कुठून शोधून काढले की ती जे काही करते ते चूकीचे करते आहे. तिने तिची चूक समजून त्या चूकीला सुधारण्याचा प्रयत्न केला. जसे जेव्हा सुदर्शनला कपडे घ्यायचे असले. तर स्मिता आपल्या पसंतीचे पाच टि-शर्ट काढायची आणि सुदर्शनला 

त्यातून एक टि-शर्ट निवडायला सांगायची. आणि सुदर्शन त्या टि-शर्ट ला आवडून घालायला लागला. सुदर्शन ला फार आनंद व्हायचा कि त्याला त्याचे मर्जीने काम करायला मिळाले. आणि दुसरी कडे त्याची मैत्रीण स्मिता पण आनंदाने राहु लागली तिच्या आवडीचे टि-शर्ट सुदर्शन ने घातले होते. अशी प्रकारे स्मिता प्रत्येक गोष्ट करु लागली. 
त्याची मैत्री घट्ट झाली. तर मित्रांनो आपल्या समजले असेल की तुम्ही कोणाला पुन्हा पुन्हा आर्डर न देता त्याला त्याची निवड द्याल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले व्यक्ती होऊ शकाल.

५) समोरच्याला त्याची चूक समजवतांना कधीही क्रोधाने व रागाने त्याला समजवू नका. 

उदाहरणार्थ : एक वेळा विजय नावाचा मुलाला घरी जाण्यासाठी उशीर झाला. तो कामात इतका व्यस्त होता. कि त्याने घरी फोन सुध्दा केला नाही. ज्यामुळे घरी आल्यावर त्याचे वडिल त्याला म्हणाले कोठे होतास. तुला अक्कल नाही आम्ही घरी वाट पाहतो आहे. असे म्हणून विजयला वडीलांनी खूप रांगावले. विजयच्या वडीलांना त्याची काळजी वाटते व विजयची यात चूकी होती. म्हणून विजयच्या वडीलांनी त्याला रांगावले होते. 

आणि दुसरी कडे विजयची आईने विजयला प्रेमाने समजावले कि कोठे होता बाळा मला माहीती आहे. तु तुझ्या कामात व्यस्त असतो. पण एक फोन तर देत जा मला तुझी खूप काळजी वाटते रे असे म्हणताच विजयने त्याच्या आईला माफी मागितली. जर विजयचे त्याला प्रेमाने समजावले असते तर त्यालात्याचे प्रेम कळले असते पण तसे नव्हता विजयला त्याच्या वडीलांन विषयी राग आला. व त्याला चूक कळाली नव्हती

तर मित्रांनो तुम्हाला कळले असेल कि समोरच्याला त्याची चूक समजवतांना कधीही क्रोधाने व रागाने त्याला समजवू नये. नाही तर तो व्यक्ती त्याची चूक न समजता. तुम्हाला दोशी ठरवेल. 


तर मित्रांनो या आहेत त्या पाच गोष्टी जे बुद्धिमान लोकं कधीही करत नाही. ही पोस्ट आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर


आणि कमेंट करुन आमची प्रेरणा नक्की वाढवा



ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: