१) बुद्धीमान माणूस कोणत्याही कारणाशिवाय माहिती कधीच घेत नाही.
बुद्धमान माणसे असे का करतात ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया : एका कॉलेज मध्ये दोन मित्र होते.
राजु आणि संजु ते दोन्ही मेहनती व अभ्यासात हुशार होते. दोन्ही त्याच्या कॉलेज मध्ये टॉप करायचे. एका दिवशी दोघांना वाटले की कॉलेजची पुस्तके वाचून आयुष्यात स्वतःचा विकास घडणार नाही. त्यामुळे त्यांनी ठरवले की आता आपण आता स्वतःचा विकास घडण्यासाठी आपण स्वत:ची सुधारणा व स्वतःचा विकास करण्याची पुस्तके वाचायची. तेव्हा समजले कि पुस्तक वाचण्याचे खूप फायदे आहे. आणि त्याने ठरवले की तो एका वर्षात ५० पुस्तके वाचणार. त्या दिवसापासून राजू एका मागे एक पुस्तक वाचू लागला त्याला खूप आनंद झाला होता की तो काही तरी नवीन शिकत होत्या होता. आणि दुसरी कडे संजूने
वर्ष भरात फक्त २५ पुस्तके वाचण्याचे ठरवले पण त्याने पुस्तक वाचण्या सोबतच त्या दिलेली टिप्स आणि नियमतो स्वत:ताच्या जीवनात उतरवू लागला तो प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी परत ते पुस्तक वाचायचा आणि त्या टॉनिक रिसर्च करायचा. व पुस्तक लिहिलेल्या लेखकान विषयी माहिती काढायचा. आणि पुढे आयुष्यात त्याने यश मिळवले याचे कारण आहे की ,
संजूने पुस्तकात शिकवलेल्या त्याच्या आयुष्यात उतरवत होता. आणि प्रत्येक गोष्ट तो बारकाईने समजून घ्यायचा ज्यामुळे तो लवकर यशस्वी झाला. आणि राजू ५० पुस्तके वाचून पण काही यश मिळवू शकला नाही.
अलबर्ट आईनस्टाईन म्हणतात : जर तुम्हाला आयुष्यातील नॉलेज पाहिजे तर ते आपल्याला अनुभवातूनच मिळू शकते. ही गोष्ट बुध्दीमान माणसाला चांगल्याप्रकारे माहिती असते. म्हणून तो जास्त माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न नाही करत म्हणूनच ते जास्त लवकर यशस्वी होतात.
२) बुध्दीमान माणसे नेहमी काम बोलून नाही तर करून दाखवतात.
या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या एक विजय नावाचा मुलगा होता. त्याचे दोन मित्र होते दर्शन आणि तेजस आणि त्यातील तेजस नावाचा मित्र हा नेहमी विजय सोबत राहयचा. तेजस नेहमी विजय ला म्हणायचा कि विजय तुझ्या आयुष्यात कोणतेही किती संकट तर मी तुझ्या पाठीशी असणार आणि दुसरी कडे दर्शन सोबत राहताना असे काहीही नाही म्हणायचा. असे खूप दिवस चालत राहीले एक दिवस
विजय पैशाची गरज भासली त्याने लगेच तेजसला फोन लावला पण तेजस कडे पैसे असूनसुद्धा त्याने विजयला नाही सांगितले. त्यानंतर विजयने दर्शन ला फोन लावला. पण दर्शन कडे पैसे नाही होते. पण दर्शनकडे पैसे नसताना त्याने लगेच दुसरीकडे पैश्याची व्यवस्था करुन त्याने विजयला पैसे दिले. तर मित्रांनो तर आपल्या समजले असणार बुध्दीमान माणसे नेहमी बोलत नाही ते नेहमी करून दाखवतात. याच गोष्टी मुळे तो त्याच्या आयुष्यात आलेल्या या प्रत्येक प्रसंगातून सहज निघतो
३) बुध्दीमान माणसे छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा बारकाईने शिकत असता.
मित्रांनो ही गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या.
एक वेळा एक उद्योजक दुसऱ्या देशात उद्योग करण्यासाठी जायला लागला. पण झाले असे की त्याचे जहाज चालूच झाले नाही. त्याने लगेच जहाजचे इंजिन ठिक करण्यासाठी सर्वात मोठे इंजिनियर बोलवले. तरी पण जहाज सुरुच झाले नाही. काही वेळाने त्या जागेवर एक वृध्द मेकॅनिक आला ज्याने त्याचे पूर्ण आयुष्या मेकॅनिक चे काम करून काढले होते. त्या वृध्द त्याच्या जवळ असलेला हातोडा काढला वर जहाज जवळ गेला. व त्या जहाज मधील प्रत्येक बारीक करून जागेवर निरीक्षण करू लागला. व तीन तास त्याने निरीक्षण केले. तिथे थांबलेले मोठ मोठे इंजिनियर त्याला पाहून हसू लागले. खूप वेळा नंतर त्या वेक्तीला जहाज सुरु न होण्याची समस्या कळली.
व त्याने जहाज मधील एका बाजूला त्याच्या जवळ असलेल्या हातोड्याने ठोकू लागला. आणि लगेच जहाज चे इंजिन सुरु झाले. हे बघून तिथे असलेले सर्व लोक आचर्यचकीत झाले. आणि तिथे उभा असलेला उद्योजकाला खूप आनंद झाला. त्याने त्या वृध्द व्यक्ती ला त्याच्या कामाची किंमत विचारली. आणि विनम्र तेणे त्या उद्योजकच्या हातात बिल दिले. हे पाहून उद्योजक चकीत झाला. आणि क्रोधाने म्हणाला की तुम्ही पागल झाला का तीन वेळा हातोडा ठोकून तू दहा हजार रुपये मागतो आहेस . तो वृध्द शांत पणे म्हणाला की सर इंजिन वर तीन हातोडा ठोकण्याचे दोन रूपये वर बरोबर जागा तपासण्याचे नऊ हजार नऊशे अठ्यांनऊ रूपये हे एकूण उद्योजक माणसाकडे बोलायला शब्द नाही होते. आणि त्या वृध्द माणसाला दहा हजार रुपये दिले.
तर मित्रांनो बघितले आपण की बुध्दीमान माणसे कशी कामे करतात ते कारण बुध्दीमान माणसाला हे माहीत असते की जर त्यांनी व्यवस्थित व नेटके पणाने काम केले. तर ते व्यवस्थित पूर्ण होईल.
४) बुध्दीमान माणसे नेहमी खूप विचारपूर्वक निवड करतात.
मित्रांनो हि गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक जुन्या काळातील एका राजाने त्याच्या प्रजेची परीक्षा घेण्याची ठरविले. त्यासाठी त्या राज्याच्या प्रवेश मार्गवर एक मोठा दगड ठेवला. तो दगड ठेवल्या मुळे राज्यातील लोकांना प्रवेश करणे व बाहेर जाणे कठीण झाले. पण कोणीही तो दगड बाजूला केला नाही. राजा सगळे दृश्य दुरून बघत होता. त्या मार्ग वरुन खूप मोठे मोठे श्रीमंत वेक्ती जाऊ लागले पण कोणीही त्या दगडाला बाजूला केले नाही. पण उलटून त्या लोक कराजा शिवीगाळ करु लागले. आणि त्या मार्गवर एक शेतकरी जात होता. त्याच्या हातात भाजी पाला ची दोन तीन पिशव्या होत्या आणि त्याला त्या मार्गा वरुन जाणे कठीण जात होते.
शेवटी त्याने त्याच्या हातातील पिशव्या बाजूला करून त्याने तो त्याने पूर्ण ताकद लाऊन तो दगड बाजूला करु लागला पण त्यावेळी त्याच्या पोटात त्रास होऊ लागला.व त्याला जखम पण तरी पण त्याने हार न मानता तो दगड त्या मार्ग वरुन बाजूला केला. जसा तो दगड बाजूला झाला. तिथे त्या जागेवर एक पिशवी मिळाली. ती पिशवी जेव्हा त्या शेतकर्याने खोलून पाहीली तेव्हा तो फार चकित झाला. कारण त्या पिशवीत एक हजार सोन्याचे नाणे होणे. आणि त्या एक चिठ्ठी पण दिलेली होती. ज्यात लिहिले होते. कि जो दगड बाजूला करेल त्याला हे एक सोन्याचे नाणे राजा कडून भेट म्हणून मिळतील. हे वाचून त्या गरीब माणसाच्या डोळ्यात अश्रू आले होते.
तर बघितले मित्रांनो त्या माणसाकडे पण निवड होती. तो माणूस पण बाकी लोकांन सारखं तो निघून जाऊ शकत होता. पण त्यानी तसे केले नाही. त्याने समोर असलेल्या संकटाशी लढला.
बुध्दीमान माणसाचे चार यशाचे रहस्य तुम्हाला कसे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.
शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा