शनिवार, २७ मार्च, २०२१

संत रामदासाची बोधकथा


 रामनवमीचा उत्सव जवळ आला होता . उत्सवाचे सारे धान्य , पैसा - अडका चाफळच्या मठातील भांडारगृहात ठेवला होता . मठाच्या अंगणात एका खाटेवर समर्थ निजले होते व कल्याणस्वामी त्यांचे पाय चेपीत होते .

 


मध्यरात्रीच्या सुमारास भांडारगृहाच्या दिशेने चार - पाच माणसे धावली. कल्याणांनी त्यांना पाहिले व ते पाय चेपता चेपता थांबले. " कल्याण, का थांबलास ? "समर्थांनी प्रश्न विचारला. कल्याण म्हणाले - “स्वामीजी, भांडारगृहामध्ये चार - पाच चोर शिरले आहेत. त्यांना जरा बडवून काढतो, नाही तर सारे धान्य आणि पैसा चोरून नेतील. ” समर्थ म्हणाले,
"बाबा रे, धान्य ना तुझे, ना माझे, हे सारे रामरायाचे आहे. त्यात आपण पहली नि : स्पृह ! आपल्याला पैशाचा मोह कायकरायचा ? " कल्याणस्वामी म्हणाले. "स्वामीजी, धटासी घट आणि   उद्धटासी उद्धट ही व्यावहारिक शिकवण आपण आम्हाला शिकवलीत. अशा बिकट प्रसंगी जर आपण वेदांत बोलू लागलो तर जगात गोधळच माजेल. पाप आणि पुण्य यांत भेदच रहाणार नाही. यात दुष्ट माणसाचे चांगलेच फावेल, तेव्हा अशा प्रसंगी त्या चोरांना योग्य शासन देणेच इष्ट होईल ! "

कल्याणच्या या बोलण्याने समर्थ निरूत्तर झाले व त्यांनी कल्याणास त्या सर्व चोरांना पकडून आणण्यास सांगितले. हातात सोटा घेऊन कल्याणस्वामी भांडारगृहात शिरले . त्यांची ती देहयष्टी व रुद्रावतार पाहून सगळे चोर घाबरले. ते त्यांच्याबरोबर समर्थान कडे येण्यास तयार झाले.


कल्याण स्वामीनी त्या सर्व चोरांना समर्थाच्या पुढे उभे केले . समर्थ त्यांना म्हणाले, "बाबांनो, कशासाठी चोरी करता ? उद्यापासून रोज मठात या व रामाची सेवा करा. मी तुम्हाला दोन वेळा जेवायला देतो. " चोरांचे हदय पालटले.


 त्यांनी समर्थांच्या व कल्याणांच्या पायावर डोके ठेवले व इतःपर चोरी न करण्याची शपथ घेतली, असे म्हणतात की, पुढे त्या चोरांच्या जीवनाला नवीनच वळण लागले. ते सारे जण विरक्त झाले व रोज मठात येऊन समर्थ आणि कल्याण सांगतील ती कामे निमूटपणे करू लागले. अशा प्रकारे समर्थ रामदासांनी संप्रदाय वाढविताना, संघटना बांधताना सर्व प्रकारच्या लोकांना जवळ केले व त्यांचे जीवन पालटले .


संत रामदासाची बोधकथा  तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा.

पुढील संत रामदासाची बोधकथेसाठी  आमच्या Premmali529.Com ची सदस्यता घ्या

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो.