Knowledge लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Knowledge लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

एप्रिल ३०, २०२१

बुध्दीमान लोक या पाच गोष्टी कधीही करत नाही

मित्रांनो या पाच गोष्टी चुकून पण तुमच्या आयुष्यात करू नका. आज आम्ही तुम्हाला आशा पाच गोष्टी सांगणार आहे. ज्या गोष्टी बुध्दीमान लोक आपल्या आयुष्यात कधीही करत नाही. तुम्हाला या गोष्टी लवकर समजण्यासाठी आम्ही काही उदाहरणे दिली आहे. 


१) कधीही कोणत्याही कारणाशिवाय वादविवाद करू नये. 

जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती सोबत कारण नसताना वादविवाद करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुकी करत आहे उदाहरणार्थ : पूजा एक हुशार मुलगी आहे. ती नेहमी शाळेतून पहिल्या क्रमांकावर पास होत असते. ती नेहमी तिचे ज्ञान वाढवत असते. तरी पण इतकी हुशार मुलगी असून ती कोणालाही आवडत नाही. कारण तिची खूप वाईट सवय ती कोणाशीही वादविवाद करत असते. आणि वादविवाद करून ती स्वतःला बरोबर आणि दुसऱ्याला चुकीच सिद्ध करत असते. 


जेव्हा पूजा तिच्या मैत्रिणींन किंवा परिवारा सोबत असायची आणि जर तिथे कोणत्या विषयावर चर्चा सुरू असायची तर पूजा स्वताला हुशार व ती बरोबर आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांन सोबत वादविवाद घालत असायची. प्रत्येक वेळा वादविवाद मध्ये 
जिंकायची पण तीच्या याच वादविवादा मुळे लोक तिच्या दुर राहायला लागले. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही कधीही कोणत्याही कारणाशिवाय समोरच्या व्यक्ती सोबत वादविवाद करतात. तेव्हा समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट फार घाण वाटते. म्हणून कधीही कोणत्याही कारणाशिवाय वादविवाद करू नये. 


 २) जेव्हा तुमची चूक नसताना कोणीही तुमच्या सोबत वादविवाद करायला येतो तेव्हा त्याच्या सोबत वादविवाद करू नका. 


उदाहरणार्थ : मित्रांनो एक सुमित नावाचा माणूस होता. तो एका बस मध्ये प्रवास करत होता. आणि त्या बाकी लोक 
पण त्या प्रवासाचा आनंद घेत होते. पण पुढच्या बस स्थानकापासून एक माणूस त्याच्या तीन लहान मुलांना घेऊन बस मध्ये चढला. ती लहान मुले बस मध्ये चढल्यावर खूप मस्ती करु लागले. उड्या मारू लागले पळू लागले व मोठ मोठ्याने आरोळ्या मारु लागले. त्या लहान मुलांन पासून बस मधील सगळ्या प्रवाश्यांना त्रास होऊ लागला. सुमित ला पण खूप त्रास होऊ लागला ज्यामुळे न राहता त्याने उठून त्या लहान मुलांच्या वडिलांन कडे जाऊन म्हणाला. सर तुम्ही आपल्या मस्ती खोर मुलांना शांत बसायला लावा. इथे सर्वाना फार त्रास होत आहे. नाहीतर आम्हाला न राहता पुढच्या बस स्थानकावर उतरावे लागेल. हे ऐकून त्या लहान मुलाच्या वडीलांना फार क्रोध आला. पण त्यांनी क्रोध न करता शांतपणे बुध्दीचा वापर करून म्हणाला.


माफ करा सर तुमचे म्हणणे बरोबर आहे मी यांना पहिलेच शांत करायला पाहिजे होते. पण दोनपूर्वी याच्या आईचे निधन झाले आहे. तेव्हापासून हि मुले शांत होऊन गेले होते. आणि जेव्हा मी यांना बाहेर फिरवण्यासाठी आणले तेव्हा ते आपल्या दु:ख विसरून आनंदाने खेळू लागले म्हणून मी यांना थांबवले नाही हे ऐकून त्या सर्व लोकांचा क्रोध एका मिनिटांत शांत झाला. 
आणि जो सुमित भांडण करायला आला होता तो त्या लहान मुलांन सोबत खेळू लागला आणि बाकी सगळे पण त्याच्या सोबत खेळू लागले. तर बघितले मित्रांनो आपण बुद्धमान लोक मोठ्या संकटातून पण सहज बाहेर निघतात. ते शत्रू ला पण आपला मित्र बनवतात. मित्रांनो तुम्ही पण आशा प्रकारे तुमच्या पासून वादविवादा दूर ठेवू शकतात.


३) कधी कोणालाही म्हणायचे नाही की तुम्ही चुकीचे आहे

मित्रांनो मला माहीत हे ऐकून तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल पण बुद्धीमान लोक कधीच सरळ कोणाला जाऊन म्हणत नाही कि तुम्ही चुकीचे आहेत. या गोष्टीला समजण्यासाठी पण आपण एक उदाहरण घेऊया. 


उदाहरणार्थ : निखिल भाऊचा चंदन लाकडाचा व्यवसाय होते. आणि ते आपल्या व्यवसाय मध्ये खूप मोठे होते. आणि दुसरी कडे संकेत भाऊ एक चांगले सुतारकाम करणारे होते. पण ते फक्त आपल्या कामात साध्या लाकडाचा वापर करत असे. एक वेळा त्यांच्या ग्राहकाने त्यांना चंदनाच्या लाकडाच्या वस्तूची आर्डर दिली. संकेत भाऊना कळले कि मार्केट मध्ये निखिल भाऊचा चंदनचे लाकूड चांगल्या क्वालिटी मध्ये देतात. तर संकेत भाऊंनी निखिल भाऊंना आर्डर दिली. पण संकेत भाऊंनी जेव्हा त्या लाकूडाना बघितले तेव्हा त्यांना खूप क्रोध आला. आणि निखिल भाऊंना शिवीगाळ देऊ लागले. 


हे ऐकून निखिल भाऊंना पण क्रोध आला पण त्यांनी आपल्या क्रोधावर कंट्रोल करून त्यांनी खूप शांतपणे संकेत भाऊंना म्हणाले. कि तुम्ही आधी चंदनच्या लाकडावर काम केले आहे का ? तेव्हा संकेत भाऊ म्हणाले नाही मी पहिल्यांदा हे काम करतोय. निखिल भाऊं त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. जर तुमचे काम झाल्यावर चंदन लाकडाची क्वालिटी चांगली नाही आहे. तर मी तुमचे पैसे वापस देऊन देईल. संकेत भाऊंना निखिल भाऊंची ही गोष्ट चांगली वाटली. आणि त्यांनी चंदन लाकडाचा वापर करणे चालू केले. आणि

एका हप्त्यात संकेत भाऊंचे काम पूर्ण झाले. आणि ते पण चांगल्या प्रकारे. तेव्हा संकेत भाऊंना आपली चुकी समजली व त्यांनी निखिल भाऊंना फोन करून माफी मागितली. 

आणि पुढच्या व्यवसायासाठी खुप मोठी आर्डर निखिल भाऊंना दिली. तर मित्रांनो बघितले निखिल भाऊंना माहित होते की संकेत भाऊ चूकीचे आहे. तरी पण त्यांनी सरळ संकेत भाऊंना म्हटले की नाही तुम्ही चूकीचे आहे. पाहीला गेलं तर ते वादविवाद करून स्वतःला बरोबर सिद्ध करु शकले असते. पण त्यांनी तसे नाही केले. त्यांनी संकेत भाऊंची चूक त्यांना कळवून दिली. आशा प्रकारे त्यांनी शत्रू ला पण मित्र बनवले.म्हणून कधी कोणालाही म्हणायचे नाही की तुम्ही चुकीचे आहे. 

४) कोणालाही पुन्हा पुन्हा आर्डर देऊ नका. 

जेव्हा कोणीही आपल्याला नौकर समजून आर्डर देतात तेव्हा आपल्याही क्रोध येतो.मित्रांनो पुन्हा पुन्हा आर्डर देण्याची सवय अत्यंत वाईट आहे. जर तुम्हाला ही सवय असेल तर तुम्ही न कळता तुमच्या आयुष्यात विष भरत आहेत. या गोष्टीला समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. 

एक सुदर्शन नावाचा मुलगा होता. त्याची मैत्रीण स्मिता त्याला खुप पुन्हा पुन्हा काम सांगत असे. याच गोष्टी मुळे सुदर्शनला असे वाटत असे की त्याच्या स्वतंत्र आयुष्यला कोणीही बंद केले आहे. याच गोष्टी पासून तो त्याच्या मैत्रीण पासून दूर राहू लागला. त्याच्या मैत्रीणला पण ही गोष्ट हळूहळू समजू लागली. ती वाटलं जर तीने काही नाही तर त्याची मैत्री संपूण जाईल. 

तिने कुठून शोधून काढले की ती जे काही करते ते चूकीचे करते आहे. तिने तिची चूक समजून त्या चूकीला सुधारण्याचा प्रयत्न केला. जसे जेव्हा सुदर्शनला कपडे घ्यायचे असले. तर स्मिता आपल्या पसंतीचे पाच टि-शर्ट काढायची आणि सुदर्शनला 

त्यातून एक टि-शर्ट निवडायला सांगायची. आणि सुदर्शन त्या टि-शर्ट ला आवडून घालायला लागला. सुदर्शन ला फार आनंद व्हायचा कि त्याला त्याचे मर्जीने काम करायला मिळाले. आणि दुसरी कडे त्याची मैत्रीण स्मिता पण आनंदाने राहु लागली तिच्या आवडीचे टि-शर्ट सुदर्शन ने घातले होते. अशी प्रकारे स्मिता प्रत्येक गोष्ट करु लागली. 
त्याची मैत्री घट्ट झाली. तर मित्रांनो आपल्या समजले असेल की तुम्ही कोणाला पुन्हा पुन्हा आर्डर न देता त्याला त्याची निवड द्याल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले व्यक्ती होऊ शकाल.

५) समोरच्याला त्याची चूक समजवतांना कधीही क्रोधाने व रागाने त्याला समजवू नका. 

उदाहरणार्थ : एक वेळा विजय नावाचा मुलाला घरी जाण्यासाठी उशीर झाला. तो कामात इतका व्यस्त होता. कि त्याने घरी फोन सुध्दा केला नाही. ज्यामुळे घरी आल्यावर त्याचे वडिल त्याला म्हणाले कोठे होतास. तुला अक्कल नाही आम्ही घरी वाट पाहतो आहे. असे म्हणून विजयला वडीलांनी खूप रांगावले. विजयच्या वडीलांना त्याची काळजी वाटते व विजयची यात चूकी होती. म्हणून विजयच्या वडीलांनी त्याला रांगावले होते. 

आणि दुसरी कडे विजयची आईने विजयला प्रेमाने समजावले कि कोठे होता बाळा मला माहीती आहे. तु तुझ्या कामात व्यस्त असतो. पण एक फोन तर देत जा मला तुझी खूप काळजी वाटते रे असे म्हणताच विजयने त्याच्या आईला माफी मागितली. जर विजयचे त्याला प्रेमाने समजावले असते तर त्यालात्याचे प्रेम कळले असते पण तसे नव्हता विजयला त्याच्या वडीलांन विषयी राग आला. व त्याला चूक कळाली नव्हती

तर मित्रांनो तुम्हाला कळले असेल कि समोरच्याला त्याची चूक समजवतांना कधीही क्रोधाने व रागाने त्याला समजवू नये. नाही तर तो व्यक्ती त्याची चूक न समजता. तुम्हाला दोशी ठरवेल. 


तर मित्रांनो या आहेत त्या पाच गोष्टी जे बुद्धिमान लोकं कधीही करत नाही. ही पोस्ट आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर


आणि कमेंट करुन आमची प्रेरणा नक्की वाढवा



ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


सोमवार, २६ एप्रिल, २०२१

एप्रिल २६, २०२१

कोरोना वायरस कसा करतो तुमच्या शरीरात प्रवेश ?

 

कोरोना वापरस ला सारस सीओव्ही - २ असेही म्हणतात ज्या   पासून होणाऱ्या आजाराला coronavirus Disease covid - 19 पण म्हणतात. कारण तो डिसेंबर २०१९ पहिल्या हप्ता मध्ये   सुरू झाला होता. कोरोना वापरस आपल्या शरीरात प्रवेश   करतो. ते आपण बघुया

कोरोना वायरस हा प्लास्टिक आणि मेटेल मध्ये जास्त वेळ नाही राहु शकतो. कोरोना चे विषाणू शरीर शोधत असतात ज्यामुळे त्याला अधिक प्रसरण्यात मदत होते. जर कोणत्या जागेवर बसले असाल आणि अचानक हा वायरस तुमच्या शरीरावर बसला असेल तर तो सर्वात पहिले तोंड किंवा नाक मार्फत तुमच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतो. 

आणि जर त्याने तुमच्या शरीरात प्रवेश केला. तर तो सरळ तुमच्या श्वास नलिका किंवा अन्ननलिका द्वारे तुमच्या फुप्फुसात प्रवेश करेल.आणि ज्या गोष्टी पुढे घडतात त्या अत्यंत धक्कादायक होतात. कोरोना हा स्व:ताला प्रसरवणे चालू करतो. आपल्या फुप्फुसात Arbo Epithelial Cells असतात ज्यामध्ये कोरोना वायरस फुप्फुसा व्दारे Arbo Epithelial Cells मध्ये मिसळून त्याचे विषाणू पसरवणे चालू करतो आणि आपले फुप्फुसातील आतडे खाने चालू करतो. हि गोष्ट जेव्हा आपल्या फुप्फुसाला कळते तेव्हा आपले फुप्फुस स्व:ताला संपवणे चालू करते.त्यानंतर 

कोरोना वायरस न थांबता आपल्या शरीरात वाढत जातो. आणि फुप्फुसातील आजुबाजूच्या गोष्टी पण हा वायरस मारुन टाकतो आणि काही दिवसानंतर आपल्या पुर्णपणे सरून जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुम्हाला नक्की माहीती असली पाहिजे ती म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जी तुमच्या शरीराला कोरोना वापरस पासून वाचवते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही कोरोना वापरस शी लढते. 

लक्षात ठेवा : जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त असेल तर रोगप्रतिकारक शक्ती कोरोना वापरसला   मारुन तुमच्या शरीराच्या बाहेर फेकून देईल. पण ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्याचा शरीरात कोरोना वापरसचा प्रभाव अती विल्हेवाट लावून टाकतो. ज्यामुळेती व्यक्ती भरण पावते. 

म्हणून ज्या व्यक्तीला कोरोना वापरस झाला आहे. आणि त्या   व्यक्ती ची रोगप्रतिकारक शक्ती जास्त तर त्याला छोटासा सर्दी   खोकला व ताप येईल आणि तो ठिक होऊन जाईल. पण   ज्याची रोगप्रतिकारक शक्ती असेल कमी असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे. 

याचा अर्थ असा नाही आहे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती   जास्त असल्यावर तुम्ही कोरोना वापरस पासून वाचण्यासाठी   दिलेले नियम पाळु नये. लक्षात ठेवा कोरोना वापरस मुळे काही   तरुण व्यक्ती मण पावले आहेत. म्हणून आपण जितके कोरोना   वापरस पासून राहु तितके बरेच. 


कोरोना वायरस पासून वाचण्याचे नियम


१) आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे

पालेभाज्या फळे खाणे. 


२) फास्ट फूड खाणे टाळावे. 


३) आपले हात सतत नेहमी पाण्याने स्वच्छ धुवावेत. 


४) घरातून बाहेर पडू नये


५) दररोज योगासने आणि व्यायाम करणे. 


 मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला कशी हे आम्हांला कमेंट करून नक्की कळवा. 

शेयर करा तुमच्या सर्व मित्रांन बरोबर


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

एप्रिल १३, २०२१

तुम्हाला या गोष्टी कधीच प्रगतीच्या दिशेने जाऊ देणार नाही

तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही काही चुका रोज करत आहेत ज्यामुळे तुम्हांला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येत नाही आहे. त्या चुका कोणत्या आहेत हे आज आम्ही तुम्हाला एका बोधकथे व्दारे सांगणार आहेत.

एका गावात एक गरीब माणूस राहत होता. जो नेहमी देवाला त्याच्या गरीबीची तक्रार करायचा. त्याची तक्रार ही होती की त्याच्या झोपडीच्या दुर राहणारा एक माणूस इतका श्रीमंत का आहे ? आणि तो इतका गरीब का ? आहे
त्या गरीब माणसाला प्रत्येक वेळी हेच वाटायचे की त्याला
देवाने सहज गरीब जन्माला घातले आहे. ज्यामुळे तो दिवस- रात्र  मेहनत  करून पण त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करु शकत नव्हता.

आता त्या गरीब माणसाची तक्रार  दिवस - रात्र ऐकून देवाने विचार केला की आज मी या गरीब माणसाला उत्तर देऊनच देतो. देवाने त्याच्या झोपडीच्या दुर राहणारा श्रीमंत माणसाला गरीब बनवून टाकले आणि दोघांना एक - एक मासे पकडण्याची काठी दिली. आता दोघे माणसे एकाच झोपडी मध्ये राहत होते. आणि ऐकाच परीस्थिती मध्ये राहत होते. कारण ते एक सारखे दोघेही गरीब होते. त्यांच्या
कडे काही महत्त्वाचे काम नाही होते.

त्यामुळे त्यांनी देवाने दिलेली काठी च्या सहाय्याने तलावात
मासे पकडण्याचे काम चालू केले. आणि पहिल्या दिवसात
दोघांनी १० - १० मासे पकडली. मासे पकडल्यावर जो माणूस पहीले गरीब होता. त्याने पुर्ण दहा मासे मार्केट २००० रुपयांना विकुन दिले. आणि त्यांने २००० रूपये
कमावले मग त्या २००० रूपयांनी त्यांने त्याच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जेवण मिठाई घेतली. आणि अशा प्रकारे त्या माणसाने ती रात्र आपल्या कुटुंबा बरोबर
पार्टी करत साजरी केली

आणि जो श्रीमंत होऊन गरीब बनला होता. त्याने मार्केट मध्ये ९ मासे विकले. आणि एक मासा तो आपल्या घरी खायला घेऊन गेला. आणि मार्केट मधील नऊ विकुन त्याने१८०० रूपये कमवले आता त्या श्रीमंत माणसाने ते पैसे रिकाम्या गोष्टी मध्ये खर्च न करता त्यांने एक आजुन मासे पकडण्याची काठी घेतली. आणि एका माणसाला ५०० रुपये देऊन. त्याच्या सोबत मासे पकडण्यासाठी ठेवले. आणि बाकीचे उरलेले ३०० रुपये बचत म्हणून वेगळे राहु दिले. ऐन कामाच्या वेळी ते आपल्या कामात येऊ शकतील  म्हणून.

दुसऱ्या दिवशी जो माणूस गरीब होता. त्याने कमवलेले सगळे पैसे खर्च केले होते. त्याने आज पुन्हा १० मासे पकडलीत या वेळेच पण त्याने तेच केले. त्यांने सगळी मासे विकुन कमवलेल्या पैशांनी त्याने त्याचे सर्व अपूर्ण शोक पुर्ण केले.  पण दुसरीकडे ज्या माणसाला देवाने गरीब बनवले होते. त्याने त्या दिवशी २० मासे पकडली.आता त्याच्या सोबत काम करायला दुसरा माणुस पण होता. त्या माणसाने २० मासे मधुन 18 मासे विकुन त्याने उरलेल्या २ मासे घरी पोट भरण्यासाठीसाठी  घेऊन आला.

पण त्याला १८०० मासे विकुन त्याला ३६०० रुपये मिळाले
त्या पैशांनी त्याने २०००  रूपयांची दोन नवीन मासे पकडण्याची काठी घेतली. आणि ५००.५०० रुपये देऊन तीन आजुन नवीन लोकांना कामावर ठेवले आणि १०० रुपये बचत केले. आणि या बाजुला तिसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला १० मासेच मिळाली. आणि त्याने तेच पैसे पुन्हा आपल्या परिवारा सोबत त्याने त्याचे शौक पुर्ण केले.
आणि त्यांने १ रुपयांची पण बचत केली नाही.


त्या सोबतच असलेल्या माणसाकडे संध्याकाळ होता होतो
४० मासे पकडले होते. कारण त्याच्या सोबत तीन आजुन
लोक  काम करत होते. त्याने घर ४ मासे घरी कुटुंबाचे पोट भरण्यासाठी घेऊन गेला. आणि बाकीच्या ३६ माशाना विकुन त्याने ७२०० रूपये कमवले आता त्या दिवशी त्या माणसाने ३००० हजार रुपयांने तीन आजुन मासे पकडण्याच्या काठ्या घेतल्या आणि चार नवीन लोकांना कामावर ठेवले. आणि आता त्यांच्या कडे सात लोकं काम करु लागली त्या माणसाने आता मासे पकडण्याचे काम बंद केले. आणि तलावाच्या ऐका किनाऱ्यावर त्याच्या कामावर लागलेल्या माणसान वर ध्यान ठेवू लागला.

इतका पैसा खर्च करून पण त्या श्रीमंत माणसाकडे आता
११०० रुपयांची बचत झाली होती. संध्याकाळ झाल्यावर त्याला ७० मासे मिळाली होती. आणि आज त्याने काही काम पण केले नाही होते. त्याने ६६ मासे विकुन १३००० रूपये कमवले. आणि त्यांच्या कडे बचत चे १३०० रूपये मिळवून त्याच्या कडे आता. १४.१०० रूपये होते आणि सोबतच 7 मासे पकडण्याच्या काठ्या व ७ माणसे होते आज श्रीमंत माणूस खुप आनंदीत होता त्याने  आपल्या परिवाराला आज पार्टी त्यांनी आज भर पोट  जेवण केले.

उरलेल्या पैशान  मधून त्याने परत नवीन मासे पकडण्याच्या काठ्या घेतल्या आणि नवीन माणसे कामावर ठेवले. आणि उरलेल्या पैशांनी त्याने बचत केली
असेच तो रोज करु लागला यामुळे तो कही दिवसांनी श्रीमंत झाला. आता त्याने नवीन घर पण घेतले होते
आणि नवीन ऑफिस पण बनवले होते. आणि ऑफिस मध्ये नवीन लोकांना कामावर ठेवले ज्यामुळे त्याला आज काम करायची गरज पडली नाही.

आणि आता दुसऱ्या बाजूला एक तो गरीब माणूस १० मासे पकडत राहीला. आणि त्या माशांना विकुन आपल्या परिवाराचे पोट भरून लागला. आणि तो श्रीमंत माणसाला पाहुन देवा कडे म्हणू लागली की मला इतके गरीब का बनवले आणि त्या श्रीमंत माणसाला गरीब बनवून पण त्यांला श्रीमंत का बनवले

आता मित्रांनो तुम्ही हुशार असाल तर तुम्ही या गोष्टीच्या स्वरूपात समजून झाल. देवाने कोणत्याही माणसा बरोबर
भेदभाव केला नाही आहे. देव सर्वाना सारख समझतो.
देव सर्वाना सारखी संधी देतो. पण काही लोक ती संधी
चा फायदा घेतात आणि ते श्रीमंत होतात. जी लोक देवाने दिलेल्या संधीचा फायदा घेत नाही ती गरीबच राहतात.
म्हणून तुम्ही गरीब आहे म्हणून देवाला दोश देत बसू नका.
व नशीबाला दोश देत बसु नका.


जर तुमच्या मध्ये देवाला दोश देण्याची व नशीबाला दोश देण्याची सवय असेल तर ती आजच सोडून द्या.

तुम्हाला ही कथा अशी वाटली व तुमच्या  मध्ये पण अशी सवय आहे का ? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

मार्च २६, २०२१

मुलाखतीपुर्वीची तयारी


मुलाखतीला जाण्यासाठी कोणती तयारी आवश्यक असते. ते आज आम्ही आपल्याला या ब्लॉक द्वारे सांगणार आहे. 

१. अभ्यास- 


तुमच्या विषयांचा सखोल अभ्यास करावा . सुरुवातीपासूनच अभ्यास केल्यास ऐनवेळी ताण पडत नाही . तुमच्या विषयाशी संलग्न परंतू अभ्यासक्रमात नसलेली माहिती असणे आवश्यक आहे
.

२. संभाव्य प्रश्नांची तयारी


मुलाखतीच्या वेळेस विचारले जाणारे बरेच प्रश्न हे उमेदवाराच्या शैक्षणिक क्षेत्राशी , कौटुंबिक पार्श्वभूमी , वैयक्तिक माहितीशी , मुलाखतीच्या उद्देशाशी संबंधित असतात .त्यामुळे अशा संभाव्य प्रश्नांच्या उत्तराचा तपशील मनात फक्त एकत्र करून ठेवावा

३. फाईल - 

स्वतःबद्दलच्या माहितीची व महत्त्वपूर्ण कागदपत्रांची फाईल तयार करून घ्यावी . त्यामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती ( बायो - डाटा ) प्रमाणपत्रे , मुलाखतीचे निमंत्रण व इतर कागदपत्रे असावीत . मुलाखतीच्या वेळी मागितल्यास ते सादर करता
येतात . 

४. आत्मविश्वास -


 मुलाखतीस जाताना कोणतीही भिती बाळगु नये मुलाखत घेणारे आपल्या वर्गशिक्षकांसारखेच शिक्षक असतात . आपली योग्यता पहाणे हे त्यांचे काम असते . व ती सिद्ध करणे आपले काम असते त्यामुळे आपण आपल्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास बाळगुन मुलाखतीस सामोरे जावे . 

५. वेळ व ठिकाण


मुलाखतीच्या निमंत्रणपत्रातील ठिकाण , वेळ व इतर माहिती काळजीपूर्वक वाचावी मुलाखतीच्या ठिकाणी दिलेल्या वेळेपूर्वी किमान १५-२० मिनिटे अगोदर हजर रहावे . मुलाखतीचे ठिकाण जर नवीन असेल तर आदल्या दिवशी ते पाहून यावे म्हणजे ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही . त्याचबरोबर किती वेळापूर्वी घरून निघावे याचीही कल्पना येईल . 

६. पोशाख -

 


उमेदवाराच्या पोशाखावरच त्याची प्रथमदर्शनी छाप पडते . म्हणून पोशाख काळजीपूर्वक निवडावा . ऋतुमानाप्रमाणे साधा ,स्वच्छ व नीटनेटका पोशाख घालून जावे . भडक रंगाचा , अती फॅशनेबल पोशाख घालून जाणे टाळावे . केस व्यवस्थित विंचरलेले असावेत . उमेवारांनी आपले केस मानेवर आणि कानावर वाढलेले नाहीत याची खात्री करावी . बूट - पॉलिश केलेले असावेत .

मुलाखतीपुर्वीची तयारी कशी करावी. हे आज आम्ही

तुम्हाला Premmali529 या ब्लॉक द्वारे माहिती दिली आहे. 

तुम्हाला  मुलाखतीपुर्वीची तयारी कशी वाटली आम्हाला

कमेंट करा. 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529 ब्लॉक वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो.


बुधवार, १० मार्च, २०२१

मार्च १०, २०२१

प्रत्यक्ष मुलाखतीसंबंधी कोणती तयारी करावी


नोकरीची संधी म्हटली की मुलाखत हा प्रश्न येतोच मुलाखत ही वेक्तीला ओळखण्यासाठी होते. अनेक वेळा
मुलाखतीला काही चुका केल्याने अनेक वेक्ती नापास होतात. प्रत्यक्ष मुलाखतीला जाताना कोणती तयारी करावी
हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.


१) मुलाखतीच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी परवानगी घ्यावी व नंतरच प्रवेश करावा.

२) उमेदवारांसाठी असलेल्या खुर्चीजवळ सावकाश. व नैसर्गिक पध्दतीत चालत जावे. फार सावकाश किंवा फार घाईने चालत जावू नये.

‌३) खुर्चीजवळ गेल्यावर अभिवादन करावे . इंग्रजीतून अभिवादन करताना मुलाखतीची वेळ लक्षात घ्यावी . ( उदा . Good Morning / Good Aftericon / Good Evening ) त्याचप्रमाणे फक्त पुरुष सभासद असतील तर Good Morning , Sir आणि पुरुष - स्त्री दोन्ही सभासद असतील तर Good Morning , , Sir and Madam असे म्हणावे.



‌४) मुलाखत घेणाऱ्यांनी बसण्यास सांगितल्याशिवाय बसू नये , बसण्यास सांगितल्यास त्याबद्दल त्यांचे आभार मानावे व बसावे
  
  

 

 ५)कोणत्याही प्रश्राची उत्तरे देताना ती टस्पष्ट शब्दात थोडक्यात द्यावीत , अनावश्यक माहिती देणे टाळावे . प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर तसे स्पष्ट सांगावे चुकीची उत्तरे देवू नयेत . उत्तर देताना सर्वांच्या नजरेला नजर मिळवून उत्तर द्यावे . त्यांच्याकडे पहाणे टाळू नये .



६) उत्तर देताना समोरच्या व्यक्तीला ऐकू जाईल इतक्या आवाजात उत्तर द्यावे . खूप मोठ्या आवाजात किंवा तोंडात पुटपुटत उत्तर देऊ नये .


७) तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे प्रश्नकर्त्याचे समाधान न झाल्यास किंवा मतभेद झाल्यास त्यावर वाद करत बसू नये .


८) प्रश्न नीट ऐकू न आल्यास तो पुन्हा सांगण्याची विनंती करावी . अंदाजाने उत्तर देणे टाळावे . त्याचप्रमाणे प्रश्र न कळाल्यास सुद्धा तसे नम्रपणे सांगावे.

९) प्रश्र न कळाल्यास सुद्धा तसे नम्रपणे सांगावे अनावश्यक हातवारे करणे , पाय हलविणे , टेबलावरील वस्तूंना हात लावणे , खूर्ची हलविणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात



१०) मुलाखतीच्या शेवटी मुलाखत घेणाऱ्यांचे आभार मानावेत. 



प्रत्यक्ष मुलाखतीसंबंधी तयारी कशी करावी. हे आज आम्ही

तुम्हाला Premmali529 या ब्लॉक द्वारे माहिती दिली आहे. 

तुम्हाला  प्रत्यक्ष मुलाखतीसंबंधी तयारी कशी वाटली आम्हाला

कमेंट करा. 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529 ब्लॉक वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो.