Religious and culture लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Religious and culture लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

एप्रिल २७, २०२१

हनुमान जयंती का साजरी केली जाते ?

 

मित्रांनो तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल कि हानुमान जयंती दर वर्षी का साजरी केली जाते ? खुप लोकांना माहीत नाही आहे. कि हानुमान जयंती ही वर्षातून दोन वेळा साजरी होते. आणि वर्षातून दोन वेळा हानुमान जयंती का साजरी केली हे आपण आज जाणून घेऊया

श्रीरामाचे प्रिय भक्त हानुमान होते. ते लहान असताना त्यांनी सूर्य गिळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि रामायणातील युद्धा मध्ये त्यांनी संजीवनी पर्वत उचलून आणला होता. अशी महान कामे हानुमानांनी केली होती भगवंत हानुमानाचा जन्म दोन वेळा तिथी प्रमाणे साजरी होतो. पहीली चैत्र पौर्णिमेला आणि दुसरा कार्तिक महिन्यातील चतुर्थी ला साजरी केला जातो. जुन्या ग्रंथात मध्ये दोन्ही तिथीचा उल्लेख केला आहे. 

पण एका तिथी मध्ये जन्म दिवस साजरा केला जातो. आणि दुसऱ्या तिथी मध्ये विजय आणि अभिनंदन च्या स्वरूपात साजरी केली जाते. जुन्या ग्रंथा मध्ये भगवंत हानुमानाच्या जयंती मागे दोन कथा सांगितल्या गेल्या आहेत. एका दिवशी भगवंत हनुमानाला अतिशय भुक लागली होती. आणि त्यांनी सूर्य नारायणा कडे बघून त्यांना वाटले की हे फळ आहे. आणि ते सूर्य

नारायणा कडे जायला निघाले आणि त्याच दिवशी राहु सूर्य नारायणाचा घात करण्यासाठी येत होता.आणि भगवंत हानुमानाला पाहून त्यांना दुसऱ्या राहु समजू लागले तेव्हा इंद्र देवाने पवन पुत्रा वर प्रहार केला होता. 

ज्यामुळे त्यांना डोक्यावर लागले ज्यामुळे त्याचे नाव हानुमान पडले होते. आणि त्या दिवशी भगवंत हानुमानाला जन्म दिवसाला एक वर्ष पूर्ण झाला होता. आणि त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती हे पण एक कारण आहे. कार्तिक पौर्णिमेची हानुमान जयंती साजरी करण्याच्या मागे.  दुसरी कथा आहे ती म्हणजे हानुमान यांनी एक वेळा सिता माता यांना कपाळावर सिंदूर लावताना पाहिले. तेव्हा न राहता भगवंत हानुमानानी सिता मातेला विचारले कि हे माते आपले कपाळावर सिंदूर लावण्याचे कारण काय तेव्हा सितामाता यांनी सांगितले होते की हे सिंदूर मी कपाळावर लावल्याने माझे स्वामी श्री रामाचे आयुष्य वाढेते. 

तेव्हा भगवंत हनुमान यांनी विचार केला. जर सिता माता कपाळावर एक चिमूटभर सिंदूर लावून श्री रामाचे आयुष्य वाढु शकते. तर मी पूर्ण अंगावर सिंदूर लावून किती आयुष्य वाढु शकतो हाच विचार करून हानुमानानी पूर्णपणे सिंदूर लावून घेतले होते. हे पाहून भगवंत हानुमानचे प्रेम भक्ती श्रीरामावर किती आहे. ते पाहून सितामाता भगवंत हनुमानावर प्रसन्न होऊन त्यांना अमरताचे वरदान दिले होते. आणि त्याच दिवाळी हा सण होता म्हणून हा दिवस पण हानुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. 



मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा


आणि शेयर करा हि पोस्ट कारण सर्वाना कळले पाहिजे कि हनुमान जयंती का साजरी केली जाते ? 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

एप्रिल २३, २०२१

अयोध्या राम मंदिर ची संघर्ष कथा

पाच शतके पासून मोठ्या वादा नंतर अयोध्या मध्ये श्रीराम मंदिर चे भूमी पुजन झाले. तर चला आज बघुया  राम मंदिर ची संघर्ष कथा व ४५२ वर्षे जुना भारताचा सगळ्यात मोठा वाद कसा चालू झाला.

१६ व्या शतकात मुघल सम्राट बाबर याने श्रीराम मंदिर तोडून बाबरी मस्जित बनवली. तेव्हा पासून यावर भांडणे चालू झाली. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर मंदिर मस्जिद देशाच्या राजकारणा मध्ये महत्त्वाची मुद्दा राहिला या मुळे हिंसा झाली आधिक लोकं मारले गेले. त्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने २०१९ मध्ये निकाल जाहीर केला. १५२८ -२९  मध्ये बाबरने मंदिरतोडून मस्जिद बनवली आयोध्या मध्ये आशा जागेवर ही मस्जिद बनवली होती.

बाबर
जिथे भगवंत श्रीराम जन्म स्थान आहे. बाबर हा १५२६ मध्ये भारतात आला होता. १५२८ मध्ये त्याचे साम्राज्य
आयोध्या पर्यंत आले होते. त्याच्या नंतर ३ शतकातील माहिती इतिहास मध्ये माहिती नाही आहे. १८५३ मध्ये पहिल्यांदा दंगे सुरू झाले  होते. १८५३ निर्मोही आखाडा यांनी सांगितले की जिथे मस्जिद आहे तिथे आधी श्रीराम मंदिर होते. त्याला बाबर ज्या साम्राज्य मध्ये तोडून टाकले होते. नंतर दोन वर्षे पर्यंत आयोध्या मध्ये हिंसा भडकली गेली. फैजाबाद गजट १९०५ नुसार  १८५५ पर्यंत हिंदू मुस्लिमान एकाच इमारत मध्ये आप आपल्या धर्मा नुसार पुजा पाठ करायचे.

रघुवर दास 
सन १८८५ मध्ये पहिल्यांदा हे भांडण जिल्हा न्यायालयात पोहोचले हिंदु महंत रघुवर दास यांनी फैजाबाद कोर्ट मध्ये
बाबरी मस्जिद च्या परीसरात  राम मंदिर बनवण्यासाठी विनंती केली. पण न्यायालयाने हि विनंती रद्द केली. १९४९   मध्ये हिंदू बांधवांनी बाबरी परीसरात श्रीराम मूर्तीची स्थापना केली होती. मुसलमानांनी  या गोष्टीचा विरोध केला आणि मस्जिद नमाज वाचणे बंद केले होते. १९९८ मध्ये हिंदू आणि मुस्लिम यांनी न्यायालयात केस केली. त्यानंतर सरकारने म्हटले कि हि जागा वादग्रस्त चे कारण बनले आहे.नंतर सरकारने त्यावर कुलुप लावून दिले.

सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परीषद हिंदू बादवांनी भगवंत श्रीराम जन्म स्थानला सोडविण्यासाठी व त्याच जागेवर राम मंदिर बनविण्यासाठी तिथे एक जाहीर सभा भरवण्यात आली. त्याच वेळी गोरखपूर धाम चे महानतं अवैधनाथ यांनी रामजन्म भूमी मुक्ती यज्ञ समिती बनवली.त्यानंतर ही जबाबदारी बीजेपी चेनेता लालकृष्ण अडवानी यांनी घेतली. जून १९९० मध्ये या प्रकरणात विश्व हिंदू परीषद औपचारिक समर्थन दिले. २५ सप्टेंबर १९९० मध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी गुजरात मधील सोमनाथ पासून तर  उत्तर प्रदेश मधील आयोध्या पर्यंत रथ यात्रा
काढली होती. यामुळे मुस्लिमांनी गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आंध्रप्रदेश दंगे सुरू केले होते. यामुळे जागो जागी
कर्फ्यू  सुरू करावे लागले.

रथ यात्रा
२३ ऑक्टोबर १९९० मध्ये लालु यादव ने बिहार मध्ये रथयात्रा थांबवून लालकृष्ण अडवानी यांना अटक केली. याच वेळी मंदिर च्या बांधकामासाठी लाखो इटा आयोध्या मध्ये पाठवल्या गेल्या होत्या. ३० ऑक्टोबर १९९० मध्ये आयोध्या मध्ये  श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी पहिल्यांदा कारसेवा चालू केली होती कारसेवकांनी मस्जिद वर चढुन झेंडा फडकवला होता. या नंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच कार सेवक मरण पावले होते. गोळीबार करण्याचा आदेश मुलायमसिंह सरकार दिला होता. तेव्हा सरकारने भांडण सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण काही उपयोग झाला नाही

बाबरी मस्जिद
१९९१ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये निवडणूकीत  मुलायमसिंह चे सरकार हारले. आणि उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ची सरकार आली. ३० ते ३१ ऑक्टोबर १९९२ मध्ये धर्म संसद मध्ये कारसेवा ची घोषणा सुरू केली. नोव्हेंबर महिन्यात युपी चे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी मस्जिद ची सुरक्षेची विनंती केली. हे भांडण इतिहासात नोंद केले आहे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये हजारो कार सेवकांनी आयोध्या कडे जावून बाबरी मस्जिद तोंडली होती. आणि तिथे आस्थायी राम मंदिर बनवले गेले. या घटनेनंतर पूर्ण सांप्रदायिक दंगे सुरू झाले. २००० हजार लोक या दंगेत मारले गेले होते


१९९४ मध्ये इलाहाबाद हायकोर्टात बाबरी मस्जिद तोडूल्यामुळे केस सुरू झाली. यात सरकारने ४९ लोकांना
अटक केली होती. २००२ मध्ये आयोध्या चे भांडण सोडवण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आयोध्या मध्ये समिती भरवण्यात आली. यामध्ये वरीष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांना हिंदू आणि मुसलमान नेत्याना एकत्र येऊन बोलण्यासाठी घेतले गेले. विश्व हिंदू परीषद ने १५ मार्च पासून राम मंदिर निर्माणासाठी घोषणा केली. शेकडो हिंदू कार्याकरता आयोध्या मध्ये जमा झाले.फेब्रुवारी मध्ये आयोध्या वरुन येणारे हिंदू कार्य करता ज्या रेल्वेतून प्रवास करत होते त्या रेल्वेला गोदरा स्टेशन आग लावून देण्यात आली. ज्यात ५८ कार्याकरता आणि अन्य लोक मरण पावले.

एप्रिल २००२ मध्ये हायकोर्टाचे तीन न्यायाधीशानी आयोध्या जागेवरून बोलणे चालू केले. मार्च पासून तर २००३ हाय कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाने आयोध्या मध्ये खोदकाम चालू पुरातत्त्व विभागाच्या विशेष अधिकार्यांनी सांगितले की मस्जिद च्या खाली मंदिर शी मिळणारे जुळणार्या गोष्टी सापडल्या आहे. व पहिले त्या जागेवर मंदिर होते हे समजले. त्यानंतर केंद्र सरकारने बाबरी मस्जिद तोडण्याच्या आरोप मध्ये सुप्रीम कोर्ट ला विनंती केली  बाबरी मस्जिद च्या जागेवर कोणतीही पुजा पाठ होणार असा आदेश सुप्रीम कोर्टा ला दिला. पण सुप्रीम कोर्टाने तो आदेश स्वीकारला नाही. मै २००३ मध्ये CBI ने आयोध्या मध्ये बाबरी मस्जिद तोडण्याच्या आरोप मध्ये लालकृष्ण अडवानी व आठ लोकांन सोबत सर्च वॉरंट काढला. ज्या मध्ये त्या सर्वांना पुन्हा अटक झाली.

लालकृष्ण अडवानी
त्या नंतर २० मे २०१० मध्ये लालकृष्ण अडवानी व आठ लोकांन ची सुटका झाली.  ३० सप्टेंबर २०१० मध्ये  इलाहाबाद हायकोर्टात लखनऊ पाठी भांडणा मध्ये त्या जागेला तीन हिस्सा मध्ये वाटले. यांच्यत एक हिस्सा राम मंदिराला मिळाला दुसरा मस्जिद चा आणि तिसरा निर्मोही आखाड्याला मिळाला. पण २०११ ला हायकोर्टात ने इलाहाबाद सुप्रीम कोर्ट वर रोख लावली. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टा वर चौदा अपील दाखल केली. २१ मार्च २०१७ मध्ये इलाहाबाद सुप्रीम कोर्टाने आप आपल्यात भांडण सोडवण्यासाठी विनंती केली. 

२५ नोव्हेंबर २०१८ ला आयोध्या विश्व हिंदू परीषद ची धर्म सभा झाली. या सभेत रामभद्राचार्य म्हणाले की लकरच यावर ठरविले जाईल त्यांनी आरोप केले कि पाच राज्यात निवडणूका चालू असल्याने निकाल लवकर येत नाही आहे. याच्या सोबतच विश्व हिंदू परीषद बोलले कि आता करा किंवा मरा हा वेळ आला आहे. देशातील प्रत्येक समाज या निकालाची वाट पाहत आहे.  १ जानेवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हणाले की आयोध्या राम मंदिर निर्माण मध्ये कानूनी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल समजला जाईल सुप्रीम कोर्टा कडे ही केस शेवटच्या पायरीवर आहे. त्या नंतर जी प्रक्रिया होईल त्यावर सरकार पुर्ण पणे सहाय्य करेल  १६ आक्टोबर २०१९ मध्ये हि केसचा पुर्ण पणे निकाल लागला. निकाल सुरक्षित राहु दिली.

सुप्रीम कोर्ट
९ नोव्हेंबर २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठ्या वादाला
बंद करून आपला इतिहासातील निकाल सांगितला. आयोध्या मधील जागेवर फक्त राम मंदिराला देण्यात आला. आणि ५ ऑगस्ट २०२० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आयोध्या राम मंदिर चे भुमि पुजन  झाले.

मित्रांनो विजय नेहमी सत्याचा होते. आणि सत्याच्या मार्गावर चालणार्या चा होतो

तुम्हांला अयोध्या राम मंदिर ची संघर्ष कथा कशी कमेंट करून नक्की सांगा. 

मित्रांनो एक विनंती आहे. कि ही पोस्ट प्रत्येक हिंदू बांधवांना पर्यंत शेयर करा. 


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद. 


आपला दिवस चांगला जावो. 

🙏जय श्रीराम🙏

रविवार, ११ एप्रिल, २०२१

एप्रिल ११, २०२१

संभाजी महाराज यांच्या बालपणाची संघर्ष कथा


संभाजी महाराज लहानपणी गणितात फार हुशार होते
संभाजी महाराजांच्या बालपणी त्यांना खुप संघर्ष करावा लागला. संघर्ष कसा करावा संघर्षीशी दोन हात कसे करावे हे त्यांना शिवाजी महाराजांनी शिकवले होते.


संभाजीराजे ज्याची आई लहानपणीच वारली असे मूल  शिवाजी महाराजांच्या पोटचा गोळा. पण दिलेरखान मिर्झाराजा जयसिंग यांच्या बरोबर झालेल्या पुरंदरच्या तहावेळी शिवाजी महाराजांना. बालक संभाजी महाराजांना (७ ते ८ वर्ष वय) दिलेरखानापाशी ओलीस ठेवावे लागले. औरंगजेबाची सरदारी स्वीकारण्यासाठी संभाजी महाराजांना करावे लागले.
आणि पुढे सुटुन आग्र्याला मृत्युच्या दाढेतही बरोबर न्यावे लागले. सारे कशासाठी ?  तर स्वराज्यासाठी प्रजेसाठी. लोकांनसाठी मी काय म्हणुन माझे लेकरू डावावर लावावे ? असा प्रश्न शिवाजी महाराजांना कधी पडला नाही यालाच म्हणावे निर्धार !


खरी परीक्षा तर पुढेच झाली. आग्र्याला औरंगजेबाने भर दरबारात  अपमान केला. तेव्हा खवळलेल्या शिवाजी महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाचा अपमान करून प्रतिज्ञा केली की. पुन्हा दरबारात येणार नाही आणि ती अखंड निर्धाराने पुरीही केली. पण एवढ्या दूर बरोबर छोटे मूल असताना हा धोका पत्करावा का ?  हा  प्रश्न शिवाजी महाराजांना पडला नाही. कुटुंबीय बरोबर  तर आपण रस्त्यातील छोटे भांडणही भांडत नाही. पड खाऊन मिटवतो .


पण इथे ?.... अखंड स्थितीचा निर्धार. पुढे तर खरी कसोटी येते ती आग्र्याहून सुटकेच्या वेळी. औरंगजेबाच्या हातावर मिठाई देऊन शिवाजी महाराज सुटले त्यावेळी त्यांनी संभाजी महाराजांना बरोबर घेतले नाही. त्यांना मागेच ठेवून ते महाराष्ट्रकडे निघाले. पोटचा पुत्र असा दुर तेही शत्रूच्या मुलखात परक्याकडे... कसे शक्य झाले असते ?
यावर ताण म्हणजे शिवाजी महाराजांनी संभाजीराजे वाटेत  ' गेले वारले ' म्हणून घोषित केले व त्यांचे दिवसही घातले... याला काय म्हणावे?


शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नियतीने जसे भरभरून दिले तसा मनस्तापही भरपूर दिला. महाराज दक्षिण दिग्विजय करून आले तो युवराज संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले ... एवढेच नव्हे तर त्यांनी दिलेरखानाकडून स्वराज्यातील भूपाळगडावर हल्लाही केला . युवराजाला समोर पाहून किल्लेदारांनी प्रतिकार केला नाही . पण हे कळताच शिवाजी महाराज भडकले . त्यांनी आदेश दिले की युवराज असला तरी हयगय नको , लढा , गोळा टाका . अखंड स्थितीचा निर्धार म्हणायचा तो यालाच . तानाजीसारखे अनेक जिवलग गेले तरी स्वराज्याचा लढा शिवाजी महाराज लढत राहिले . ते या अखंड स्थितीच्या निर्धारामुळेच .

तुम्हाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची संघर्ष कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

शनिवार, २७ मार्च, २०२१

मार्च २७, २०२१

संत रामदासाची बोधकथा


 रामनवमीचा उत्सव जवळ आला होता . उत्सवाचे सारे धान्य , पैसा - अडका चाफळच्या मठातील भांडारगृहात ठेवला होता . मठाच्या अंगणात एका खाटेवर समर्थ निजले होते व कल्याणस्वामी त्यांचे पाय चेपीत होते .

 


मध्यरात्रीच्या सुमारास भांडारगृहाच्या दिशेने चार - पाच माणसे धावली. कल्याणांनी त्यांना पाहिले व ते पाय चेपता चेपता थांबले. " कल्याण, का थांबलास ? "समर्थांनी प्रश्न विचारला. कल्याण म्हणाले - “स्वामीजी, भांडारगृहामध्ये चार - पाच चोर शिरले आहेत. त्यांना जरा बडवून काढतो, नाही तर सारे धान्य आणि पैसा चोरून नेतील. ” समर्थ म्हणाले,
"बाबा रे, धान्य ना तुझे, ना माझे, हे सारे रामरायाचे आहे. त्यात आपण पहली नि : स्पृह ! आपल्याला पैशाचा मोह कायकरायचा ? " कल्याणस्वामी म्हणाले. "स्वामीजी, धटासी घट आणि   उद्धटासी उद्धट ही व्यावहारिक शिकवण आपण आम्हाला शिकवलीत. अशा बिकट प्रसंगी जर आपण वेदांत बोलू लागलो तर जगात गोधळच माजेल. पाप आणि पुण्य यांत भेदच रहाणार नाही. यात दुष्ट माणसाचे चांगलेच फावेल, तेव्हा अशा प्रसंगी त्या चोरांना योग्य शासन देणेच इष्ट होईल ! "

कल्याणच्या या बोलण्याने समर्थ निरूत्तर झाले व त्यांनी कल्याणास त्या सर्व चोरांना पकडून आणण्यास सांगितले. हातात सोटा घेऊन कल्याणस्वामी भांडारगृहात शिरले . त्यांची ती देहयष्टी व रुद्रावतार पाहून सगळे चोर घाबरले. ते त्यांच्याबरोबर समर्थान कडे येण्यास तयार झाले.


कल्याण स्वामीनी त्या सर्व चोरांना समर्थाच्या पुढे उभे केले . समर्थ त्यांना म्हणाले, "बाबांनो, कशासाठी चोरी करता ? उद्यापासून रोज मठात या व रामाची सेवा करा. मी तुम्हाला दोन वेळा जेवायला देतो. " चोरांचे हदय पालटले.


 त्यांनी समर्थांच्या व कल्याणांच्या पायावर डोके ठेवले व इतःपर चोरी न करण्याची शपथ घेतली, असे म्हणतात की, पुढे त्या चोरांच्या जीवनाला नवीनच वळण लागले. ते सारे जण विरक्त झाले व रोज मठात येऊन समर्थ आणि कल्याण सांगतील ती कामे निमूटपणे करू लागले. अशा प्रकारे समर्थ रामदासांनी संप्रदाय वाढविताना, संघटना बांधताना सर्व प्रकारच्या लोकांना जवळ केले व त्यांचे जीवन पालटले .


संत रामदासाची बोधकथा  तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा.

पुढील संत रामदासाची बोधकथेसाठी  आमच्या Premmali529.Com ची सदस्यता घ्या

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो.