नोकरीची संधी म्हटली की मुलाखत हा प्रश्न येतोच मुलाखत ही वेक्तीला ओळखण्यासाठी होते. अनेक वेळा
मुलाखतीला काही चुका केल्याने अनेक वेक्ती नापास होतात. प्रत्यक्ष मुलाखतीला जाताना कोणती तयारी करावी
हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
२) उमेदवारांसाठी असलेल्या खुर्चीजवळ सावकाश. व नैसर्गिक पध्दतीत चालत जावे. फार सावकाश किंवा फार घाईने चालत जावू नये.
३) खुर्चीजवळ गेल्यावर अभिवादन करावे . इंग्रजीतून अभिवादन करताना मुलाखतीची वेळ लक्षात घ्यावी . ( उदा . Good Morning / Good Aftericon / Good Evening ) त्याचप्रमाणे फक्त पुरुष सभासद असतील तर Good Morning , Sir आणि पुरुष - स्त्री दोन्ही सभासद असतील तर Good Morning , , Sir and Madam असे म्हणावे.
४) मुलाखत घेणाऱ्यांनी बसण्यास सांगितल्याशिवाय बसू नये , बसण्यास सांगितल्यास त्याबद्दल त्यांचे आभार मानावे व बसावे
५)कोणत्याही प्रश्राची उत्तरे देताना ती टस्पष्ट शब्दात थोडक्यात द्यावीत , अनावश्यक माहिती देणे टाळावे . प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर तसे स्पष्ट सांगावे चुकीची उत्तरे देवू नयेत . उत्तर देताना सर्वांच्या नजरेला नजर मिळवून उत्तर द्यावे . त्यांच्याकडे पहाणे टाळू नये .
६) उत्तर देताना समोरच्या व्यक्तीला ऐकू जाईल इतक्या आवाजात उत्तर द्यावे . खूप मोठ्या आवाजात किंवा तोंडात पुटपुटत उत्तर देऊ नये .
७) तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे प्रश्नकर्त्याचे समाधान न झाल्यास किंवा मतभेद झाल्यास त्यावर वाद करत बसू नये .
८) प्रश्न नीट ऐकू न आल्यास तो पुन्हा सांगण्याची विनंती करावी . अंदाजाने उत्तर देणे टाळावे . त्याचप्रमाणे प्रश्र न कळाल्यास सुद्धा तसे नम्रपणे सांगावे.
९) प्रश्र न कळाल्यास सुद्धा तसे नम्रपणे सांगावे अनावश्यक हातवारे करणे , पाय हलविणे , टेबलावरील वस्तूंना हात लावणे , खूर्ची हलविणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात
१०) मुलाखतीच्या शेवटी मुलाखत घेणाऱ्यांचे आभार मानावेत.
प्रत्यक्ष मुलाखतीसंबंधी तयारी कशी करावी. हे आज आम्ही
तुम्हाला Premmali529 या ब्लॉक द्वारे माहिती दिली आहे.
तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीसंबंधी तयारी कशी वाटली आम्हाला
कमेंट करा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529 ब्लॉक वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.











कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा