सोमवार, ५ एप्रिल, २०२१

शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम


आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीर तंदुरुस्ती कडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम जे तुम्ही घरात राहून पण करु शकता.

पुर्ण झोप घेणे


आपण सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे कारण झोप मुळे आपल्या शरीरातील सर्व अवयव व मेंदू विश्रांती घेत असतात आणि  नवीन उर्जा घेत असतात. जर आपण पुर्ण झोप घेतली नाही तर आपल्या मायग्रेन सारख्या मोठ्या आजाराला समोर जावे लागते. त्यामुळे मुळे आपण पूर्ण झोप घेतली पाहिजे.


रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे


आताचे तरुण मोबाईल मुळे उशिरा झोपतात. लक्षात ठेवा
रात्री चे १० ते सकाळ चे ४ च्या दरम्यान आपली शरीरातील अवयव व मेंदू विश्रांती व नवीन उर्जा घेत असतात. उशिरा झोपल्यामुळे आपल्या शरीरातील मेंदू व अवयवांना विश्रांती न मिळाल्यामुळे त्याचे काम करणे कमी होते. त्यामुळे खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात. 👇
१) चिडचिड होणे
२) डोके दुखणे
३) डोळे सुजणे
४) कोणत्याही कामात मन न लागणे
इत्यादी लक्षणे सहज दिसून येतात.
त्यामुळे रात्री १० वाजेच्या आगोदर जेव्हा जमेल तितक्या आगोदर आपण झोपलो पाहिजे.
सकाळी लवकर उठणे हा निसर्गाचा नियम आहे. सकाळी लवकर उठून ओझन वायू घेतला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे आपले शरीर रोगान पासून दूर राहते. त्यामुळे आपण सकाळी सूर्योदयाच्या लवकर उठले
पाहिजे.

पौष्टीक आहार फळे आणि पालेभाज्या  खाणे


आपण कडधान्य आणि पालेभाज्या दिवसातून तीन वेळा खाल्या पाहिजे यामुळे आपल्या शरीराला जीवनसत्व  मिळते आणि शरीर रोगान पासून दूर राहते. बाहेरील फास्टफूड खाऊ नये  फास्टफूड हे रोगाना आमंत्रण करते.
व आपल्या शरीराला पण ते हानिकारक आहे. यामुळे जमेल तितके फळे कडधान्य पालेभाज्या खावे आणि निरोगी राहावे.

जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये


जर तुम्ही जेवण झाल्यावर किंवा जेवण चालू असताना पाणी पित तर यामुळे आपल्या शरीरातील अन्न पचन होणार नाही. आणि आपल्या शरीरातील भूक पण मंदावते
जेवण तुम्ही आर्धीतासांनी पाणी प्यावे. यामुळे आपल्या
शरीरातील पचन शक्ती चांगली असेल लक्षात असु  द्या आपल्या शरीरातील जठर अग्नी गरम झाल्यावर आपल्याला भूक लागते पण आपण पाणी पिऊन त्याला शांत करतो. यामुळे काही लोकांना भूक लागत नाही

चह कॉफी पिणे बंद करा आणि दुध पिणे चालू करा


सकाळी उठल्यावर सर्वांना एकाच गोष्टीची गरज असते. ती म्हणजे चहा कॉफी. ९० टक्के जगातील लोकं चहा व कॉफी पितात.  मित्रांनो चहा कॉफी हा एक नशा आहे. दिवसातुन काहीचा नियम आहे. चहा आणि कॉफी दोन तीन वेळा पितात पण आपल्या शरीरासाठी चहा कॉफी  खूप हानीकारक आहे. यामुळे आपल्या शरीरातील पेशी मंद पणे चालतात यामुळे आपल्याला झोप लागत नाही. भुक न लागणे. सतत जिभेवर छाले पडणे ही लक्षणे त्वरित दिसून येतात. चहा कॉफी पिण्यापेक्षा  रोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना एक ग्लास दुध पिणे चालू करा. ज्यामुळे आपल्या शरीरातील  कॅल्शियम वाढेल. तर आजच आपण चहा कॉफी पिणे बंद करा


शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम याची माहिती

तुम्हाला Premmali529.Com द्वारे दिली आहे. 

तुम्हाला शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम ही पोस्ट कशी वाटली आम्हाला

कमेंट करा. 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: