रविवार, ११ एप्रिल, २०२१

संभाजी महाराज यांच्या बालपणाची संघर्ष कथा


संभाजी महाराज लहानपणी गणितात फार हुशार होते
संभाजी महाराजांच्या बालपणी त्यांना खुप संघर्ष करावा लागला. संघर्ष कसा करावा संघर्षीशी दोन हात कसे करावे हे त्यांना शिवाजी महाराजांनी शिकवले होते.


संभाजीराजे ज्याची आई लहानपणीच वारली असे मूल  शिवाजी महाराजांच्या पोटचा गोळा. पण दिलेरखान मिर्झाराजा जयसिंग यांच्या बरोबर झालेल्या पुरंदरच्या तहावेळी शिवाजी महाराजांना. बालक संभाजी महाराजांना (७ ते ८ वर्ष वय) दिलेरखानापाशी ओलीस ठेवावे लागले. औरंगजेबाची सरदारी स्वीकारण्यासाठी संभाजी महाराजांना करावे लागले.
आणि पुढे सुटुन आग्र्याला मृत्युच्या दाढेतही बरोबर न्यावे लागले. सारे कशासाठी ?  तर स्वराज्यासाठी प्रजेसाठी. लोकांनसाठी मी काय म्हणुन माझे लेकरू डावावर लावावे ? असा प्रश्न शिवाजी महाराजांना कधी पडला नाही यालाच म्हणावे निर्धार !


खरी परीक्षा तर पुढेच झाली. आग्र्याला औरंगजेबाने भर दरबारात  अपमान केला. तेव्हा खवळलेल्या शिवाजी महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाचा अपमान करून प्रतिज्ञा केली की. पुन्हा दरबारात येणार नाही आणि ती अखंड निर्धाराने पुरीही केली. पण एवढ्या दूर बरोबर छोटे मूल असताना हा धोका पत्करावा का ?  हा  प्रश्न शिवाजी महाराजांना पडला नाही. कुटुंबीय बरोबर  तर आपण रस्त्यातील छोटे भांडणही भांडत नाही. पड खाऊन मिटवतो .


पण इथे ?.... अखंड स्थितीचा निर्धार. पुढे तर खरी कसोटी येते ती आग्र्याहून सुटकेच्या वेळी. औरंगजेबाच्या हातावर मिठाई देऊन शिवाजी महाराज सुटले त्यावेळी त्यांनी संभाजी महाराजांना बरोबर घेतले नाही. त्यांना मागेच ठेवून ते महाराष्ट्रकडे निघाले. पोटचा पुत्र असा दुर तेही शत्रूच्या मुलखात परक्याकडे... कसे शक्य झाले असते ?
यावर ताण म्हणजे शिवाजी महाराजांनी संभाजीराजे वाटेत  ' गेले वारले ' म्हणून घोषित केले व त्यांचे दिवसही घातले... याला काय म्हणावे?


शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नियतीने जसे भरभरून दिले तसा मनस्तापही भरपूर दिला. महाराज दक्षिण दिग्विजय करून आले तो युवराज संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले ... एवढेच नव्हे तर त्यांनी दिलेरखानाकडून स्वराज्यातील भूपाळगडावर हल्लाही केला . युवराजाला समोर पाहून किल्लेदारांनी प्रतिकार केला नाही . पण हे कळताच शिवाजी महाराज भडकले . त्यांनी आदेश दिले की युवराज असला तरी हयगय नको , लढा , गोळा टाका . अखंड स्थितीचा निर्धार म्हणायचा तो यालाच . तानाजीसारखे अनेक जिवलग गेले तरी स्वराज्याचा लढा शिवाजी महाराज लढत राहिले . ते या अखंड स्थितीच्या निर्धारामुळेच .

तुम्हाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची संघर्ष कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: