शनिवार, ८ मे, २०२१

मे ०८, २०२१

PUBG गेम भारतात होणार या तारखेला लॉच आणि त्या सोबत होतील हे फायदे

मित्रांनो आम्ही तुम्हाला पबजी गेम हा भारतात परत येणार आहे असे सांगितले होते. आणि आज आम्ही सांगणार आहे पबजी गेम ची भारतात लॉच होण्याची तारीख. 


KRAFTON कंपनीने Tencent सोबत टाई कट केला आहे. जी एक चिनी कंपनी आहे. आणि PUBG MOBILE INDIA जो भारतात लॉच होणार होता त्याच्या जागेवर त्याचे नाव बदलवून BATTLEGROUND MOBILE INDIA लॉच होणार आहे. या गेम मध्ये सर्व काही भारतीय सॉफ्टवेअर वापरले आहे. आणि भारतातील 
टूर्नामेंट यात होत जातील आणि कोणत्याही चीनी कंपनी सोबत सबंध नसणार Kraft On कंपनीने हेही सांगितले आहे की आपली Policy व Right सोबत respect आहे. 

BATTLEGROUND MOBILE INDIA च्या वेबसाइटवर असे लिहिले आहे. की या गेम मधील सर्व डेटा हा भारताच्या सर्वर मध्ये सेवा केला जाईल आणि भारतीय कंपनी सोबतच ऑपरेट होईल. या सोबत कंपनीने हे पण आहे की या गेमसाठी भारतात नोकरीसाठी जागा निघणार आहे. आणि करोडो ची गुंतवणूक भारतात या गेम मध्ये होणार आहे. 


कंपनी या गेम मध्ये TIME RESTRICTIONS पण लावू शकते. आणि जेव्हा तुम्ही गुगल सर्च कराल BATTLEGROUND MOBILE INDIA तेव्हा आपल्याला खूप परीणाम सापडतील आणि त्यात काही वेबसाइट आपल्याला पाहायला मिळतील. जे तुम्हाला APK Provide करतील पण यांना आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करायचे नाही आहे. 

कारण काय आहे. हा टॉपिक ट्रेडिंग मध्ये आहे. आणि याचा फायदा हॅकर उचलत आहे. ते त्याच नावाचे कीवर्ड व वेबसाइट तयार करत आहे. आणि हे गुगल मध्ये रॅक वर दाखवत आहे. आणि BATTLEGROUND MOBILE INDIA चा APK लॉच झालेला आहे असे म्हणतात. व हे पाहून युजर्स ते APK इंस्टॉल करुन त्यावर Allow Allow क्लिक केल्यानंतर मेसेज

गॅलरी व इतर गोष्टी हॅकर हॅक करून घेतात. www.battlegroundsmobileindia.com ही या गेमची मुख्य वेबसाइट आहे. BATTLEGROUND MOBILE INDIA हा गेम आमच्या मते १५ ऑगस्ट २०२१ या तारखेला लॉच करणार आहे. कारण भारतीय गेम FAUG हा गेम २६ जानेवारी २०२१ रोजी लॉच झाला होता. BATTLEGROUND MOBILE INDIA हा गेम लॉच व्हायला काही वेळही लागू शकतो. 


हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हांला कमेंट करून नक्की कळवा


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो

मंगळवार, ४ मे, २०२१

मे ०४, २०२१

बुध्दीमान माणसाचे चार यशाचे रहस्य

मित्रांनो या जगात सर्व जण श्रीमंत निर्माण नाही आहे. याचे कारण की लोक कोठे तर आयुष्यात चुका करतात ज्यामुळे ते गरीब राहून जातात.तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे श्रीमंत माणसाचे चार यशाचे रहस्य तर. 


१) बुद्धीमान माणूस कोणत्याही कारणाशिवाय माहिती कधीच घेत नाही. 


बुद्धमान माणसे असे का करतात ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया : एका कॉलेज मध्ये दोन मित्र होते.

राजु आणि संजु ते दोन्ही मेहनती व अभ्यासात हुशार होते. दोन्ही त्याच्या कॉलेज मध्ये टॉप करायचे. एका दिवशी दोघांना वाटले की कॉलेजची पुस्तके वाचून आयुष्यात स्वतःचा विकास घडणार नाही. त्यामुळे त्यांनी ठरवले की आता आपण आता स्वतःचा विकास घडण्यासाठी आपण स्वत:ची सुधारणा व स्वतःचा विकास करण्याची पुस्तके वाचायची. तेव्हा समजले कि पुस्तक वाचण्याचे खूप फायदे आहे. आणि त्याने ठरवले की तो एका वर्षात ५० पुस्तके वाचणार. त्या दिवसापासून राजू एका मागे एक पुस्तक वाचू लागला त्याला खूप आनंद झाला होता की तो काही तरी नवीन शिकत होत्या होता. आणि दुसरी कडे संजूने

वर्ष भरात फक्त २५ पुस्तके वाचण्याचे ठरवले पण त्याने पुस्तक वाचण्या सोबतच त्या दिलेली टिप्स आणि नियमतो स्वत:ताच्या जीवनात उतरवू लागला तो प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी परत ते पुस्तक वाचायचा आणि त्या टॉनिक रिसर्च करायचा. व पुस्तक लिहिलेल्या लेखकान विषयी माहिती काढायचा. आणि पुढे आयुष्यात त्याने यश मिळवले याचे कारण आहे की , 

संजूने पुस्तकात शिकवलेल्या त्याच्या आयुष्यात उतरवत होता. आणि प्रत्येक गोष्ट तो बारकाईने समजून घ्यायचा ज्यामुळे तो लवकर यशस्वी झाला. आणि राजू ५० पुस्तके वाचून पण काही यश मिळवू शकला नाही.  

अलबर्ट आईनस्टाईन म्हणतात : जर तुम्हाला आयुष्यातील नॉलेज पाहिजे तर ते आपल्याला अनुभवातूनच मिळू शकते. ही गोष्ट बुध्दीमान माणसाला चांगल्याप्रकारे माहिती असते. म्हणून तो जास्त माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न नाही करत म्हणूनच ते जास्त लवकर यशस्वी होतात. 


२) बुध्दीमान माणसे नेहमी काम बोलून नाही तर करून दाखवतात.

या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या एक विजय नावाचा मुलगा होता. त्याचे दोन मित्र होते दर्शन आणि तेजस आणि त्यातील तेजस नावाचा मित्र हा नेहमी विजय सोबत राहयचा. तेजस नेहमी विजय ला म्हणायचा कि विजय तुझ्या आयुष्यात कोणतेही किती संकट तर मी तुझ्या पाठीशी असणार आणि दुसरी कडे दर्शन सोबत राहताना असे काहीही नाही म्हणायचा. असे खूप दिवस चालत राहीले एक दिवस 

विजय पैशाची गरज भासली त्याने लगेच तेजसला फोन लावला पण तेजस कडे पैसे असूनसुद्धा त्याने विजयला नाही सांगितले. त्यानंतर विजयने दर्शन ला फोन लावला. पण दर्शन कडे पैसे नाही होते. पण दर्शनकडे पैसे नसताना त्याने लगेच दुसरीकडे पैश्याची व्यवस्था करुन त्याने विजयला पैसे दिले. तर मित्रांनो तर आपल्या समजले असणार बुध्दीमान माणसे नेहमी बोलत नाही ते नेहमी करून दाखवतात. याच गोष्टी मुळे तो त्याच्या आयुष्यात आलेल्या या प्रत्येक प्रसंगातून सहज निघतो 

३) बुध्दीमान माणसे छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा बारकाईने शिकत असता


मित्रांनो ही गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या. 

एक वेळा एक उद्योजक दुसऱ्या देशात उद्योग करण्यासाठी जायला लागला. पण झाले असे की त्याचे जहाज चालूच झाले नाही. त्याने लगेच जहाजचे इंजिन ठिक करण्यासाठी सर्वात मोठे इंजिनियर बोलवले. तरी पण जहाज सुरुच झाले नाही. काही वेळाने त्या जागेवर एक वृध्द मेकॅनिक आला ज्याने त्याचे पूर्ण आयुष्या मेकॅनिक चे काम करून काढले होते. त्या वृध्द त्याच्या जवळ असलेला हातोडा काढला वर जहाज जवळ गेला. व त्या जहाज मधील प्रत्येक बारीक करून जागेवर निरीक्षण करू लागला. व तीन तास त्याने निरीक्षण केले. तिथे थांबलेले मोठ मोठे इंजिनियर त्याला पाहून हसू लागले. खूप वेळा नंतर त्या वेक्तीला जहाज सुरु न होण्याची समस्या कळली. 

व त्याने जहाज मधील एका बाजूला त्याच्या जवळ असलेल्या हातोड्याने ठोकू लागला. आणि लगेच जहाज चे इंजिन सुरु झाले. हे बघून तिथे असलेले सर्व लोक आचर्यचकीत झाले. आणि तिथे उभा असलेला उद्योजकाला खूप आनंद झाला. त्याने त्या वृध्द व्यक्ती ला त्याच्या कामाची किंमत विचारली. आणि विनम्र तेणे त्या उद्योजकच्या हातात बिल दिले. हे पाहून उद्योजक चकीत झाला. आणि क्रोधाने म्हणाला की तुम्ही पागल झाला का तीन वेळा हातोडा ठोकून तू दहा हजार रुपये मागतो आहेस . तो वृध्द शांत पणे म्हणाला की सर इंजिन वर तीन हातोडा ठोकण्याचे दोन रूपये वर बरोबर जागा तपासण्याचे नऊ हजार नऊशे अठ्यांनऊ रूपये हे एकूण उद्योजक माणसाकडे बोलायला शब्द नाही होते. आणि त्या वृध्द माणसाला दहा हजार रुपये दिले. 

तर मित्रांनो बघितले आपण की बुध्दीमान माणसे कशी कामे करतात ते कारण बुध्दीमान माणसाला हे माहीत असते की जर त्यांनी व्यवस्थित व नेटके पणाने  काम केले. तर ते व्यवस्थित पूर्ण होईल. 

४) बुध्दीमान माणसे नेहमी खूप विचारपूर्वक निवड करतात.

मित्रांनो हि गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक जुन्या काळातील एका राजाने त्याच्या प्रजेची परीक्षा घेण्याची ठरविले. त्यासाठी त्या राज्याच्या प्रवेश मार्गवर एक मोठा दगड ठेवला. तो दगड ठेवल्या मुळे राज्यातील लोकांना प्रवेश करणे व बाहेर जाणे कठीण झाले. पण कोणीही तो दगड बाजूला केला नाही. राजा सगळे दृश्य दुरून बघत होता. त्या मार्ग वरुन खूप मोठे मोठे श्रीमंत वेक्ती जाऊ लागले पण कोणीही त्या दगडाला बाजूला केले नाही. पण उलटून त्या लोक कराजा शिवीगाळ करु लागले. आणि त्या मार्गवर एक शेतकरी जात होता. त्याच्या हातात भाजी पाला ची दोन तीन पिशव्या होत्या आणि त्याला त्या मार्गा वरुन जाणे कठीण जात होते. 

शेवटी त्याने त्याच्या हातातील पिशव्या बाजूला करून त्याने तो त्याने पूर्ण ताकद लाऊन तो दगड बाजूला करु लागला पण त्यावेळी त्याच्या पोटात त्रास होऊ लागला.व त्याला जखम पण तरी पण त्याने हार न मानता तो दगड त्या मार्ग वरुन बाजूला केला. जसा तो दगड बाजूला झाला. तिथे त्या जागेवर एक पिशवी मिळाली. ती पिशवी जेव्हा त्या शेतकर्याने खोलून पाहीली तेव्हा तो फार चकित झाला. कारण त्या पिशवीत एक हजार सोन्याचे नाणे होणे. आणि त्या एक चिठ्ठी पण दिलेली होती. ज्यात लिहिले होते. कि जो दगड बाजूला करेल त्याला हे एक सोन्याचे नाणे राजा कडून भेट म्हणून मिळतील. हे वाचून त्या गरीब माणसाच्या डोळ्यात अश्रू आले होते. 


 तर बघितले मित्रांनो त्या माणसाकडे पण निवड होती. तो माणूस पण बाकी लोकांन सारखं तो निघून जाऊ शकत होता. पण त्यानी तसे केले नाही. त्याने समोर असलेल्या संकटाशी लढला. 

 

बुध्दीमान माणसाचे चार यशाचे रहस्य तुम्हाला कसे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो


सोमवार, ३ मे, २०२१

मे ०३, २०२१

कोरोनावर उपचार तुम्ही घरी राहून पण करू शकतात.

तुम्हाला कोरोना वायरस झाला असेल तर तुम्ही उपचार घरी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत. ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कोरोना वायरस पासून बरे व्हाल. देशात सध्या हॉस्पिटल मध्ये बेड कमी पडता आहेत. म्हणून जास्त करून डॉक्टरांचा ह सल्ला देत आहेत की तुम्ही घरी राहून पण कोरोना वर उपचार करू शकतात.

१) घरी राहून कोणते सदस्य कोरोना वर उपचार घेऊ शकतात.

जर तुम्हाला ताप.डोकेदुखी.सर्दी. अन्नाची चव लागत नाही आहे. तर तुम्ही घरी उपचार करू शकतात. पण जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. छातीत दुखते आहे. असे लक्षणे दिसून अल्यावर तुम्ही कोरोनाचा घरी उपचार करू शकत नाही. तुम्हाला हॉस्पिटल मध्येच उपचार करावा लागेल. जर श्वास घ्यायला त्रास होणे व छातीत दु:खते याचा अर्थ म्हणजे तुम्हाच्या शरीरात कोरोना जास्त झाला आहे. त्यामुळे तुम्हाला घरी राहून उपचार न घेता हॉस्पिटल मध्येच उपचार करावा लागेल.

२) घरी उपचार घेत असताना करा या गोष्टी. 

जर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था करु शकतात. तर तुम्ही घरी राहून पण उपचार करु शकतात. पण याचा सल्ला तुम्ही डॉक्टरांन कडून घ्या. तरच ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था घरी राहून करा. तुमच्या घरात थर्मामीटर.ऑक्सिजन. नेहमी राहु द्या आणि एक तक्ता बनवा. थर्मामीटर व ऑक्सिजन द्वारे दिवस भरातून दोन वेळा शरीरातील तापमान व ऑक्सिजन मोजत राहा. व बनवलेल्या तक्त्यात नोंद करा. आणि डॉक्टरांना शेयर करा. ज्यामुळे डॉक्टर तुम्हाला त्यानुसार उपचार सांगू शकतील. तुम्हाला गोळ्या बदलवणे असेल. कि तुम्हाला कोणती टेस्ट करण्याची आवश्यकता आहे की नाही. तुमची हॉस्पिटल मध्ये जाण्याची शक्यता आहे की नाही
हि सर्व माहिती आपल्याला डॉक्टर तक्ता पाहून देतील.

३) घरी उपचार करत असताना काही हेल्थ टिप्स व नियम. 

पाणी. लिंबू पाणी. ओ.आर.एस जास्त पिणे ज्यामुळे तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढेल. व शरीर तंदुरुस्त राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला दिवसभर आराम न करता घरात शरीराची हालचाल करणे महत्त्वाचे आहे. जर घरातील  एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर बाकीचे घरातील सदस्य कसे सुरक्षित राहतील ? हा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल. तर यावर डॉक्टरांनी सांगितले. की ज्या घरातील सदस्याला कोरोना झाला असेल तर घरातील एक रुम त्या व्यक्तीला राहण्यासाठी देणे व त्या रुममध्ये घरातील सदस्यांनी जाऊ नये.

 

फक्त घरातील एकाच सदस्याने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला जेवण देण्यासाठी जावे.आणि त्या व्यक्तीने डबल मास्क घालून ठेवावे. १ किंवा २ मीटर पासून दूर राहणे. आणि जेवण रूमच्या बाहेर ठेवणे.जेवण बाहेर ठेवल्याची सूचना फोन द्वारे त्या व्यक्तीला कळवणे. आणि रुममध्ये वापरलेल्या सर्व वस्तू फेकून देणे व त्या वस्तू घरातील सदस्यांना वापरू देऊ नये. त्यानंतर अशी वेळ येऊ देऊ नका. की तुम्हाला व त्या वेक्तीला  हॉस्पिटल मध्ये जाव लागेल. उशिर झाला नको पाहिजे हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ही काळजी घ्या.

४) हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उशिर व्हायला नको. म्हणून त्यासाठी घ्यावी ही काळजी.



जर ऑक्सिजन चे प्रमाण ९२ च्या खाली जात असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. ते तुम्हांला उपाय सांगतील काय करावे काय नाही. तुम्हाला बोलताना त्रास होत असेल आणि तुमच्या फुप्फुसात पहिल्या पेक्षा जास्त त्रास होत असेल आणि श्वास एक कमी प्रमाणात घेता येतो आहे. दमल्या सारखं होतय तर डॉक्टरांना संपर्क सांगा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या डॉक्टरांना नेहमी आपली माहिती देणे गरजेचे आहे. आणि कोरोना वायरस झाल्यावर जास्त घाबरू नका. विश्वास ठेवा स्व:ता वर की तुम्ही लवकर बरे  होणार.


मित्रांनो हि माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही आपल्या पर्यंत पोहचवली आहे. मित्रांनो हि माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. व्हाट्सऍप ग्रुप फेसबुक ग्रुप शक्य होईल तितके सर्वाना ही माहिती पोहचवा.


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो



रविवार, २ मे, २०२१

मे ०२, २०२१

दर १०० वर्षानंतर २० शतकातच का येते ही महामारी.

मित्रांनो कोरोना वायरस ही पहील्यांदाच नाही आहे. याच्या आधीही तीन वेळा अशी महामारी आली आहे. या विषयी तुम्हांला माहीत नाही आहे. आणि आम्ही त्याच खतरनाक महामारी विषयी सांगणार आहे. कोरोना पहीले पण अनेक वायरस आलेले आहे. ज्यामुळे लाखो करोडो लोक मरण पावले होते. आणि प्रत्येक १०० वर्षा मध्ये आलेल्या वायरस मध्ये सर्वात चकीत होण्याची गोष्ट म्हणजे २० वे शतक मित्रांनो २० वे काय आहे ज्यामुळे हे वायरस त्याच वेळी निर्माण होतात. तर बघुया याचे कारण काय आहे 

             १७२० प्लेग

या जगात सर्वात पहीले येणारी महामारी म्हणजे प्लेग या आजाराने वर्ष १७२० मध्ये पूर्ण जगात भीती पसरवली होती. प्लेग या रोगाला त्या काळात प्लेग ऑफ मार्शली असे म्हटले जात होते. मार्शली हे फ्रान्स देशातील मधील एक शहर आहे. आणि शहरातूनच प्लेग या आजाराची सुरुवात झाली होती. प्लेग या आजाराने त्या काळात फार भीतीचे वातावरण निर्माण केले होते.हा आजार जरी फ्रान्स देशातून आला होता. तरी भारतात हा चीन या देशातून आला होता.

कारण प्लेग या आजाराची सुरूवात चीन मधील काही गर्दी च्या वातावरणातून झाली होती. त्या नंतर ती धीरे धीरे बाकीच्या देशात प्रसरली होती. पण त्याकाळात जणसंख्या इतकी जास्त नव्हती. तरी पण प्लेग या आजाराने १ लाख लोकांना मरण पावले होते. ज्यामधून ५० हजार लोक एका महिन्यातच मरण पावले होते. आणि बाकीचे लोक २ वर्षा नंतर मरण पावले होते.

           १८२० कॉलरा


प्लेग नंतर १००  वर्षा नंतर कोलोरा या आजारची महामारी आली होती. कोलोरा या आजाराची महामारी चा प्रभाव जास्त करून एशिया देशात झाला होता. ज्यामध्ये जपान. भारत. बँकॉक.जावा.भूतान.चायना.मॉरीशस.सीरीया.या सगळ्या देशात मध्ये हा आजाराचा प्रसार चालू झाला होता. हा आजार पण वायरस पासून पसरत होता. या आजाराची लक्षणे होती. सतत उलट्या होणे. शरीर दुखणे ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते लोक मरण पावले होते. या आजाराने जावा या देशात १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आणि सर्वात जास्त मृत्यू थायलंड.विलिपीन.इंडोनेशिया. मध्ये झाली.

       १९२० स्पेनिश फ्लू

स्पेनिश फ्लू ची लक्षणे World war  संपण्याच्या च्या पहिलेच दिसून येत होते. पण World War संपल्यावर स्पेनिश फ्लू हा आजार १९२० मध्ये सगळ्यात जास्त प्रसार झाला. कारण आजर World War च्या वेळेस पश्चिमी मोरचे मधील Army Camps पसरने चालू झाली. आणि जेव्हा World War संपल्यावर जेव्हा सगळे सैनिक घरी जाऊ लागले तेव्हा त्यांच्या सोबत स्पेनिश फ्लू हा आजार पण जाऊ लागला. आणि ही माहामारी त्या काळातील सर्वात मोठी महामारी होती. ज्यामध्ये World War पेक्षा आधिक लोक स्पेनिश फ्लू या आजाराने मरण पावले होते.जर संख्या बघितली तर ५ करोड लोकांचा तेव्हा फ्लू या आजाराने मृत्यू झाला होता.

      २०२० कोरोना वायरस

मित्रांनो आतापर्यंत आम्ही आपल्याला आम्ही जुन्या काळातील माहामारी विषयी सांगितले पण तेव्हा विज्ञानाने इतकी प्रगती केली नव्हती. पण आज विज्ञाने प्रगती करून पण आपल्याला घरात बसणे भाग पाडले आहे. त्याचे कारण आहे. आत्ताच्या काळात पसरलेला आजार कोरोना वायरस ज्यामुळे लाखो लोकांन प्रसार झालेली आहे. ज्यामुळे आत्तापर्यंत २ लाख १६ हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आणि ही संख्या किती पर्यंत वाढत जाणार आहेत. हे समजणार नाही आहे. बाकी एक गोष्ट नक्की कळली आहे. आपल्याला. (प्रकृती जेव्हा होईल तेव्हा मनुष्याला गुडघे टेकवू शकते). त्यामुळे घरातच राहा विनाकारण बाहेर पडू नका.


हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

एप्रिल ३०, २०२१

बुध्दीमान लोक या पाच गोष्टी कधीही करत नाही

मित्रांनो या पाच गोष्टी चुकून पण तुमच्या आयुष्यात करू नका. आज आम्ही तुम्हाला आशा पाच गोष्टी सांगणार आहे. ज्या गोष्टी बुध्दीमान लोक आपल्या आयुष्यात कधीही करत नाही. तुम्हाला या गोष्टी लवकर समजण्यासाठी आम्ही काही उदाहरणे दिली आहे. 


१) कधीही कोणत्याही कारणाशिवाय वादविवाद करू नये. 

जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती सोबत कारण नसताना वादविवाद करत असाल तर तुम्ही खूप मोठी चुकी करत आहे उदाहरणार्थ : पूजा एक हुशार मुलगी आहे. ती नेहमी शाळेतून पहिल्या क्रमांकावर पास होत असते. ती नेहमी तिचे ज्ञान वाढवत असते. तरी पण इतकी हुशार मुलगी असून ती कोणालाही आवडत नाही. कारण तिची खूप वाईट सवय ती कोणाशीही वादविवाद करत असते. आणि वादविवाद करून ती स्वतःला बरोबर आणि दुसऱ्याला चुकीच सिद्ध करत असते. 


जेव्हा पूजा तिच्या मैत्रिणींन किंवा परिवारा सोबत असायची आणि जर तिथे कोणत्या विषयावर चर्चा सुरू असायची तर पूजा स्वताला हुशार व ती बरोबर आहे हे दाखवण्यासाठी सगळ्यांन सोबत वादविवाद घालत असायची. प्रत्येक वेळा वादविवाद मध्ये 
जिंकायची पण तीच्या याच वादविवादा मुळे लोक तिच्या दुर राहायला लागले. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही कधीही कोणत्याही कारणाशिवाय समोरच्या व्यक्ती सोबत वादविवाद करतात. तेव्हा समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट फार घाण वाटते. म्हणून कधीही कोणत्याही कारणाशिवाय वादविवाद करू नये. 


 २) जेव्हा तुमची चूक नसताना कोणीही तुमच्या सोबत वादविवाद करायला येतो तेव्हा त्याच्या सोबत वादविवाद करू नका. 


उदाहरणार्थ : मित्रांनो एक सुमित नावाचा माणूस होता. तो एका बस मध्ये प्रवास करत होता. आणि त्या बाकी लोक 
पण त्या प्रवासाचा आनंद घेत होते. पण पुढच्या बस स्थानकापासून एक माणूस त्याच्या तीन लहान मुलांना घेऊन बस मध्ये चढला. ती लहान मुले बस मध्ये चढल्यावर खूप मस्ती करु लागले. उड्या मारू लागले पळू लागले व मोठ मोठ्याने आरोळ्या मारु लागले. त्या लहान मुलांन पासून बस मधील सगळ्या प्रवाश्यांना त्रास होऊ लागला. सुमित ला पण खूप त्रास होऊ लागला ज्यामुळे न राहता त्याने उठून त्या लहान मुलांच्या वडिलांन कडे जाऊन म्हणाला. सर तुम्ही आपल्या मस्ती खोर मुलांना शांत बसायला लावा. इथे सर्वाना फार त्रास होत आहे. नाहीतर आम्हाला न राहता पुढच्या बस स्थानकावर उतरावे लागेल. हे ऐकून त्या लहान मुलाच्या वडीलांना फार क्रोध आला. पण त्यांनी क्रोध न करता शांतपणे बुध्दीचा वापर करून म्हणाला.


माफ करा सर तुमचे म्हणणे बरोबर आहे मी यांना पहिलेच शांत करायला पाहिजे होते. पण दोनपूर्वी याच्या आईचे निधन झाले आहे. तेव्हापासून हि मुले शांत होऊन गेले होते. आणि जेव्हा मी यांना बाहेर फिरवण्यासाठी आणले तेव्हा ते आपल्या दु:ख विसरून आनंदाने खेळू लागले म्हणून मी यांना थांबवले नाही हे ऐकून त्या सर्व लोकांचा क्रोध एका मिनिटांत शांत झाला. 
आणि जो सुमित भांडण करायला आला होता तो त्या लहान मुलांन सोबत खेळू लागला आणि बाकी सगळे पण त्याच्या सोबत खेळू लागले. तर बघितले मित्रांनो आपण बुद्धमान लोक मोठ्या संकटातून पण सहज बाहेर निघतात. ते शत्रू ला पण आपला मित्र बनवतात. मित्रांनो तुम्ही पण आशा प्रकारे तुमच्या पासून वादविवादा दूर ठेवू शकतात.


३) कधी कोणालाही म्हणायचे नाही की तुम्ही चुकीचे आहे

मित्रांनो मला माहीत हे ऐकून तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल पण बुद्धीमान लोक कधीच सरळ कोणाला जाऊन म्हणत नाही कि तुम्ही चुकीचे आहेत. या गोष्टीला समजण्यासाठी पण आपण एक उदाहरण घेऊया. 


उदाहरणार्थ : निखिल भाऊचा चंदन लाकडाचा व्यवसाय होते. आणि ते आपल्या व्यवसाय मध्ये खूप मोठे होते. आणि दुसरी कडे संकेत भाऊ एक चांगले सुतारकाम करणारे होते. पण ते फक्त आपल्या कामात साध्या लाकडाचा वापर करत असे. एक वेळा त्यांच्या ग्राहकाने त्यांना चंदनाच्या लाकडाच्या वस्तूची आर्डर दिली. संकेत भाऊना कळले कि मार्केट मध्ये निखिल भाऊचा चंदनचे लाकूड चांगल्या क्वालिटी मध्ये देतात. तर संकेत भाऊंनी निखिल भाऊंना आर्डर दिली. पण संकेत भाऊंनी जेव्हा त्या लाकूडाना बघितले तेव्हा त्यांना खूप क्रोध आला. आणि निखिल भाऊंना शिवीगाळ देऊ लागले. 


हे ऐकून निखिल भाऊंना पण क्रोध आला पण त्यांनी आपल्या क्रोधावर कंट्रोल करून त्यांनी खूप शांतपणे संकेत भाऊंना म्हणाले. कि तुम्ही आधी चंदनच्या लाकडावर काम केले आहे का ? तेव्हा संकेत भाऊ म्हणाले नाही मी पहिल्यांदा हे काम करतोय. निखिल भाऊं त्यांना म्हणाले की तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. जर तुमचे काम झाल्यावर चंदन लाकडाची क्वालिटी चांगली नाही आहे. तर मी तुमचे पैसे वापस देऊन देईल. संकेत भाऊंना निखिल भाऊंची ही गोष्ट चांगली वाटली. आणि त्यांनी चंदन लाकडाचा वापर करणे चालू केले. आणि

एका हप्त्यात संकेत भाऊंचे काम पूर्ण झाले. आणि ते पण चांगल्या प्रकारे. तेव्हा संकेत भाऊंना आपली चुकी समजली व त्यांनी निखिल भाऊंना फोन करून माफी मागितली. 

आणि पुढच्या व्यवसायासाठी खुप मोठी आर्डर निखिल भाऊंना दिली. तर मित्रांनो बघितले निखिल भाऊंना माहित होते की संकेत भाऊ चूकीचे आहे. तरी पण त्यांनी सरळ संकेत भाऊंना म्हटले की नाही तुम्ही चूकीचे आहे. पाहीला गेलं तर ते वादविवाद करून स्वतःला बरोबर सिद्ध करु शकले असते. पण त्यांनी तसे नाही केले. त्यांनी संकेत भाऊंची चूक त्यांना कळवून दिली. आशा प्रकारे त्यांनी शत्रू ला पण मित्र बनवले.म्हणून कधी कोणालाही म्हणायचे नाही की तुम्ही चुकीचे आहे. 

४) कोणालाही पुन्हा पुन्हा आर्डर देऊ नका. 

जेव्हा कोणीही आपल्याला नौकर समजून आर्डर देतात तेव्हा आपल्याही क्रोध येतो.मित्रांनो पुन्हा पुन्हा आर्डर देण्याची सवय अत्यंत वाईट आहे. जर तुम्हाला ही सवय असेल तर तुम्ही न कळता तुमच्या आयुष्यात विष भरत आहेत. या गोष्टीला समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. 

एक सुदर्शन नावाचा मुलगा होता. त्याची मैत्रीण स्मिता त्याला खुप पुन्हा पुन्हा काम सांगत असे. याच गोष्टी मुळे सुदर्शनला असे वाटत असे की त्याच्या स्वतंत्र आयुष्यला कोणीही बंद केले आहे. याच गोष्टी पासून तो त्याच्या मैत्रीण पासून दूर राहू लागला. त्याच्या मैत्रीणला पण ही गोष्ट हळूहळू समजू लागली. ती वाटलं जर तीने काही नाही तर त्याची मैत्री संपूण जाईल. 

तिने कुठून शोधून काढले की ती जे काही करते ते चूकीचे करते आहे. तिने तिची चूक समजून त्या चूकीला सुधारण्याचा प्रयत्न केला. जसे जेव्हा सुदर्शनला कपडे घ्यायचे असले. तर स्मिता आपल्या पसंतीचे पाच टि-शर्ट काढायची आणि सुदर्शनला 

त्यातून एक टि-शर्ट निवडायला सांगायची. आणि सुदर्शन त्या टि-शर्ट ला आवडून घालायला लागला. सुदर्शन ला फार आनंद व्हायचा कि त्याला त्याचे मर्जीने काम करायला मिळाले. आणि दुसरी कडे त्याची मैत्रीण स्मिता पण आनंदाने राहु लागली तिच्या आवडीचे टि-शर्ट सुदर्शन ने घातले होते. अशी प्रकारे स्मिता प्रत्येक गोष्ट करु लागली. 
त्याची मैत्री घट्ट झाली. तर मित्रांनो आपल्या समजले असेल की तुम्ही कोणाला पुन्हा पुन्हा आर्डर न देता त्याला त्याची निवड द्याल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले व्यक्ती होऊ शकाल.

५) समोरच्याला त्याची चूक समजवतांना कधीही क्रोधाने व रागाने त्याला समजवू नका. 

उदाहरणार्थ : एक वेळा विजय नावाचा मुलाला घरी जाण्यासाठी उशीर झाला. तो कामात इतका व्यस्त होता. कि त्याने घरी फोन सुध्दा केला नाही. ज्यामुळे घरी आल्यावर त्याचे वडिल त्याला म्हणाले कोठे होतास. तुला अक्कल नाही आम्ही घरी वाट पाहतो आहे. असे म्हणून विजयला वडीलांनी खूप रांगावले. विजयच्या वडीलांना त्याची काळजी वाटते व विजयची यात चूकी होती. म्हणून विजयच्या वडीलांनी त्याला रांगावले होते. 

आणि दुसरी कडे विजयची आईने विजयला प्रेमाने समजावले कि कोठे होता बाळा मला माहीती आहे. तु तुझ्या कामात व्यस्त असतो. पण एक फोन तर देत जा मला तुझी खूप काळजी वाटते रे असे म्हणताच विजयने त्याच्या आईला माफी मागितली. जर विजयचे त्याला प्रेमाने समजावले असते तर त्यालात्याचे प्रेम कळले असते पण तसे नव्हता विजयला त्याच्या वडीलांन विषयी राग आला. व त्याला चूक कळाली नव्हती

तर मित्रांनो तुम्हाला कळले असेल कि समोरच्याला त्याची चूक समजवतांना कधीही क्रोधाने व रागाने त्याला समजवू नये. नाही तर तो व्यक्ती त्याची चूक न समजता. तुम्हाला दोशी ठरवेल. 


तर मित्रांनो या आहेत त्या पाच गोष्टी जे बुद्धिमान लोकं कधीही करत नाही. ही पोस्ट आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर


आणि कमेंट करुन आमची प्रेरणा नक्की वाढवा



ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

एप्रिल २९, २०२१

व्हॉट्सॲप वर होत आहेत या फसवणूकी

 

मित्रांनो व्हॉट्सॲप वर सध्या फसवणूकी वाढत चाललेल्या आहे. या फसवणूकी कोणत्या आहेत आणि आपण त्या फसवणूकी पासून कसे दुर राहायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. 

आपल्या रोजच्या जीवनात बोर होऊन काहीतरी नवीन हवं असतं आपल्याला आणि याच गोष्टीचा फायदा उचलून काही लोकांनी गुलाबी व्हॉट्सॲप काढले आहे. आणि गुलाबी व्हॉट्सॲप पासून आपल्याला का दुर राहायचे आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत. गुलाबी व्हॉट्सॲप इंस्टॉल केल्यानंतर आपल्या फोन मध्ये विविध प्रकारचे फिचर्स पाहायला मिळतील. 

असे मेसेज तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर आले असतील तर सावध राहा. कारण गुलाबी व्हॉट्सॲप हे एक फसवणूकी चे ॲप आहे. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर करुन अनेक युजर्स ला फटका बसला आहे. हे ॲपचा गुलाबी रंग फार आकर्षक आहे. आणि याच आकर्षणा मुळे इंस्टॉल करतात. सर्व प्रथम इंस्टॉल झाल्यावर हे ॲप आपल्याला परमिशन देणायची विनंती देतो.आणि हे ॲप परमिशन दिल्यावरच चालू होते यामुळे युजर्सने परमिशन देऊन देतात. ज्यामुळे युजर्स चा सर्व डाटा चोरला जातो. आणि त्यांच्या सोबत त्याचा मोबाईल पण हैक होतो. 

मित्रांनो हेच नाही तर व्हॉट्सॲप वर अशी अनेक मेसेज येतात फ्रि मध्ये रिचार्ज मिळणार किंवा या खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळवा आयफोन फ्रि मध्ये किंवा अनेक बक्षीसे मिळवा फ्रि मध्ये. मित्रांनो हे सर्व हॅकर्सकडून टाकलेले जाळे असतात ज्या मध्ये युजर्स सहज फसत आहे. जास्त करून हेकर्स भारत सरकारच्या खोट्या मोफत सवलतीच्या लिंक व्हॉट्सॲप ग्रुप वर सहज पसरवतात ज्यामुळे युजर्स सहज फसतात. 


लक्षात ठेवाव्हॉट्सॲप कंपनीचे कोणतेही नवीन फिचर्स आधी गुगल प्लेस स्टोर अपलोड करते. व्हॉट्सॲप कंपनी कोणतीही लिंग किंवा पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप पाठवत नाही. 


मित्रांनो हि माहिती व्हॉट्सॲप वर प्रत्येक ग्रुप व मित्रांन बरोबर शेयर करा. ज्यामुळे कोणताही युजर्स हैकर च्या जाळ्यात बळी पडू नये. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो